शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

हिंगोली जिल्ह्यात फ्लोराईडग्रस्त गावे अद्याप दुर्लक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:06 AM

जिल्ह्यात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गावांचे प्रकरण असिम सरोदे यांनी हरित लवादाकडे दाखल केले होते. दोन वर्षांपासून यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आदेशित करूनही अद्याप यात फारशी कारवाई झाली नाही.

ठळक मुद्दे१0४ गावांत १४५ स्त्रोत दूषित : हरित लवादाकडे प्रश्न जाऊनही प्रशासनाची गती मंद

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गावांचे प्रकरण असिम सरोदे यांनी हरित लवादाकडे दाखल केले होते. दोन वर्षांपासून यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आदेशित करूनही अद्याप यात फारशी कारवाई झाली नाही.हिंगोली जिल्ह्यात तब्बल १९८ गावांमध्ये फ्लोराईडची समस्या आढळून आली होती. यामध्ये औंढा-१, वसमत-१६, सेनगाव-४६, कळमनुरी-६८, हिंगोली- ६७ अशी तालुकानिहाय गावांची संख्या होती. त्यात फ्लोराईडयुक्त पाणीपुरवठा होत असलेल्या गावांतील लोकांना हाडांचे आजार जडत आहेत. तसेच दातेही पिवळी पडली. काहींचे दात एवढे झिजले की तारुण्यातच वार्धक्याचा अनुभव येत आहे. परंतु याबाबत हरित लवादाकडे प्रश्न गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अनेक ठिकाणचे स्त्रोत सील केले होते.दरम्यान, दुष्काळी परिस्थिती आली अन् ग्रामस्थांनी त्यात पाण्यासाठी असे स्त्रोतही अनेक ठिकाणी उघडे केले. काही ठिकाणी तर ग्रामपंचायतींनी लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र टंचाईपुढे काहीच चालले नाही. फ्लोराईडग्रस्त गावांपैकी जवळपास १३ गावांत त्यावेळी कोणतीच पाणीपुरवठा योजना नव्हती. त्यानंतर याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. आता नेमकी काय परिस्थिती आहे. याचा कोणालाच ताळमेळ नाही. आरोग्य विभाग अहवाल देवून मोकळा झाला. पाणीपुरवठा विभागाने ही गावे प्राधान्य यादीत तेवढी टाकली. त्यापुढील औपचिरकतांचे मात्र काहीच होत नाही.आता नव्याने या गावांसाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर कारवाई सुरू झाली. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी बैठक घेतल्यानंतर १0४ गावांतील १४५ स्त्रोत फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले असे सांगितले जात आहे. तर या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासण्या झाल्याचेही सांगितले जाते. त्यात केवळ दातांचे आजार असलेले लोकच आढळले. इतर प्रकारचे आजार असलेले रुग्ण नव्हते, असा अहवाल आहे. मात्र या सर्व गावांत फेरतपासणी होणे गरजेचे आहे. शिवाय अनेक गावांनी पुन्हा सील उघडून स्त्रोत वापरणे सुरू केले होते. तेही बंद होणे गरजेचे आहे. खºया अर्थाने तपासणी झाली तर यात रुग्णांची संख्या जास्त आढळून येण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी : कृती आराखडा सादर कराहिंगोली जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त गावांची फेरतपासणी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आढळून आलेल्या सर्व गावांत पाणीपुरवठ्याच्या काही उपाययोजना आहेत की नाहीत. नसतील तर नवीन योजना अथवा प्रादेशिक योजना व इतर योजनांवरून अशा गावांना पाणी देण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचा आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली आहे. फ्लोराईडग्रस्त गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. त्यामुळेच वस्तूनिष्ठ अहवाल मागविला आहे.