शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औंढा येथे विविध कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

औंढा नागनाथः औंढा येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नायब तहसीलदार वैजनाथ ...

औंढा नागनाथः औंढा येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, नायब तहसीलदार सचिन जोशी, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, गटविकास अधिकारी जगदीश शाहू, गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे, मुख्याधिकारी सचिन जयस्वाल, गटशिक्षणाधिकारी पाडुरंग लांडगु, बालप्रकल्प अधिकारी नयना पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, गजानन कदम, शैलेश वाईकर, ज्योती केजकर, संजय पाटील, अनिल पाथरकर, शरद नाईकनवरे, गजानन वाटोरे, उमाकांत मुळे यांच्यासह तहसीलमधील कर्मचारी मंडलाधिकारी, तलाठी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार व पोलीस ध्वजारोहण कार्यक्रमास हजर होते.

औंढा नागनाथ येथील पंचायत समिती

औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीमध्ये प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण सभापती संगीता ईश्वर ढेकळे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसभापती भीमराव कऱ्हाळे, गटविकास अधिकारी जगदीश शाहू, गटशिक्षणाधिकारी पांडुरंग लांडगु, माजी सभापती भीमराव भगत, प्रशासन अधिकारी बालाजी घाडगे, गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे, अशोक खोकले, उदय देशपांडे, लक्ष्मण कुरुडे, मनोज कांबळे, शिवाजी टोम्पे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, कर्मचारी व गटसाधन केंद्रमधील कर्मचारी हजर होते.

औंढा नागनाथ येथील पोलीस ठाणे

औंढा नागनाथ : येथील पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा वाळकेसह पोलीस कर्मचारी या ध्वजारोहण कार्यक्रमास हजर होते.

औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद

औंढा नागनाथ : येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक शिवाजी मोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ध्वजारोहणास नगराध्यक्षा विजयमाला मुळे, उपनगराध्यक्षा वच्‍छलाबाई देशमुख, अनिल देशमुख, विजय डमरे, वैशाली राऊत, अर्चना बांगर, वेदांत शिंदे, रुक्मिणीताई गोरेसह शिक्षकवृंद, पत्रकार व गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते.

औंढा नागनाथ येथील एकात्मिक बालविकास केंद्र

औंढा नागनाथ : येथील एकात्मिक बालविकास केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण बालप्रकल्प अधिकारी नयना पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसन्नजीत खडसे, आनंद दहीवाल, पार्वतीताई रणवीरसह बालप्रकल्प कार्यालयातील कर्मचारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडीताई, मदतनीस या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी हजर होते.

नागेश्वर शाळा औंढा नागनाथ

औंढा नागनाथ : येथील पोलीस नागेश्वर शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष राम नागरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका सीताताई नागरे, माजी उपसरपंच माणिकराव पाटील, गणेश देशमुख, बाळासाहेब साळवे, मुख्याध्यापक शेख सय्यद, प्राचार्य ज्ञानोबा लांडे, उद्धव नागरे, प्रदुन्न नागरे, पांडुरंग गीते, सचिन जाधव, प्रदीप गोरेसह शिक्षकवृंद व गावातील प्रतिष्ठित नागरिक या ध्वजारोहण कार्यक्रमास हजर होते.

नागनाथ विद्यालय औंढा नागनाथ

औंढा नागनाथ : येथील नागनाथ विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक परसराम नागरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्याध्यापक संजय पोले, क्रीडाशिक्षक शंकर शिरसाट, राजू चोंढेकर, एस. पी. खाडे, विष्णू पवार, कैलास माळी, पी. के. घुगे, सरोजनी देवकते, कविता पाटील, मोहन पाटील, संजय चाटे, मारोती सोळंके, भगवान सानप, गजानन कामठे, सोपान आघाव, अर्जुन कुटे, संजय चाटे, प्रा. रमेश वाव्हुळे, सुभाष पाचलेगावकरसह प्राध्यापक, शिक्षक व शिपाई या ध्वजारोहण कार्यक्रमास हजर होते.

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय

औंढा नागनाथ : येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष गजानन वाखरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महेंद्र डांगे, अतिश कापसे, सोपान देशमुख, नागनाथ देशमुख, विलास काळे, सुदाम वाखरकर, ज्ञानेश्वर वाखरकरसह शिक्षकवृंद, पत्रकार व गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते.

नगरपंचायत व हुतात्मा स्मारक

औंढा नागनाथ : येथील नगरपंचायत व हुतात्मा स्मारक येथे प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण नगराध्यक्षा विजयमाला मुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी सचिन जयस्वाल, उपनगराध्यक्षा वच्‍छलाबाई देशमुख, विजय महामुने, उत्तम जाधव, अनिल नागरे, मंजुषा जाधव, राधा काळे, राजू गोरे, नलिनी उत्तरवारसह नगरसेवक, नगरसेविका व प्रतिष्ठित नागरिक ध्वजारोहण कार्यक्रमास हजर होते. फाेटाे नं. ०७