शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर आजारावर पाच लाखांची शासन मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:49 IST

मुख्यमंत्री सहायता निधीसह म.फुले जीवनदायी योजनेत गंभीर आजारावर मिळणारा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा. आरोग्य विभागाचे काम चांगले असून गावातच लोकांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुख्यमंत्री सहायता निधीसह म.फुले जीवनदायी योजनेत गंभीर आजारावर मिळणारा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा. आरोग्य विभागाचे काम चांगले असून गावातच लोकांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी केले.तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, शासनाने आरोग्याविषयी विविध उपाय केले आहेत. ग्रामपातळीवर यासाठी शासनाने यंत्रणा उभी केली आहे. त्यांच्यामार्फत लोकांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर योजनेचा लाभ मिळायला विलंब होतो. त्यामुळे रुग्णांना लक्षणानुसार वरच्या रुग्णालयात पाठविले तर योग्य वेळेत निदान होऊन शासन रुग्णांसाठी खर्च करीत असलेली रक्कम उपयोगात येईल. आपला जिल्हा आरोग्य सुविधा देण्यात राज्यात तिसऱ्या स्थानी आहे. मात्र हा भाग आणि परिस्थिती पाहता आपण पहिल्या स्थानीच आहोत असे मानले पाहिजे. तरीही पहिल्या स्थानावर येण्यासाठी प्रयत्न सोडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी मंचावर महिला व बालकल्याण अधिकारी गणेश वाघ, भानुदास जाधव, संतोष टेकाळे, अ‍ॅड. अमोल जाधव, खेडेकर, शिंदे, कोटकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.नामदेव कोरडे यांनी केले. यावेळी तालुक्यातून आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्थात्मक प्रसुतीचे काम ९४ टक्क्यांवर पोहोचले असून जननी सुरक्षा योजनेत एप्रिलपासून आजपर्यंत ३४२ महिलांना लाभ दिला. पीएमएमव्हीवाय योजनेत १२६८ जणांना लाभ दिल्याचे सांगण्यात आले. मुलींचा जन्मदर हजारामागे ९८८ एवढा आहे. यात चांगली सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. तर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात शाळांमध्ये ५0८ जणांना संदर्भ सेवा दिली. तर अंगणवाड्यांतून ५१८ जणांना संदर्भसेवा दिल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स