पाचशे, दोन हजारांच्या नोटांचा रंग उडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:10+5:302021-03-04T04:57:10+5:30

८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री नंतर पाचशे व एक हजारच्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर नवीन पाचशे व ...

Five hundred, two thousand notes blew out | पाचशे, दोन हजारांच्या नोटांचा रंग उडाला

पाचशे, दोन हजारांच्या नोटांचा रंग उडाला

Next

८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री नंतर पाचशे व एक हजारच्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर नवीन पाचशे व दोन हजारच्या नोटा चलनात आल्या. मात्र पाचशे व दोन हजारच्या नोटांच्या कागदाचा दर्जा निकृष्ट असल्याने अशा नोटा पाण्यात भिजल्यास रंग निघून जात आहे. त्यामुळे फाटक्या व नोटबंदीनंतर लगेच चलनात आलेल्या पाचशे व दोन हजारच्या नोटा स्वीकारण्यास बँकांसह ग्राहकही टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अशा नोटांचे करायचे काय असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहत आहे. फाटक्या नोटा बँकेत बदलून दिल्या जात असल्याचे बोलले जात असले तरी अशा नोटा स्वीकारण्यास बँका तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अशी नाेट आल्यास ग्राहक लगेच दुसऱ्या व्यवहारात खर्च करण्याला प्राधान्य देत आहेत. नोटाचे रंग उडत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत असला तरी यासंदर्भात तक्रारीच आल्या नसल्याचा दावा बँका करीत आहेत.

राष्ट्रीयकृत बँकांकडे एकही तक्रार नाही

- जिल्ह्यात पाचशे व दोन हजाराच्या नोटांचा रंग उडत असल्याच्या संदर्भात शहरातील अकोला रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेत विचारणा केली असता नोटांचा रंग जात असल्याने नोटा बदलून द्याव्यात अशी एकही तक्रार आली नसल्याचे शाखा व्यवस्थापकांनी सांगितले.

- शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना विचारणा केली असता, कोणत्याही नोटांचा रंग उडत नाही. पावसात भिजली तरी नोटा शाबूत असतात. नोटांचा रंग जात असेल तर अशा नोटा फेक नोटा असू शकतात, असे त्यांनी सांगितले. तसेच आमच्याकडे अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बँकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे यासंदर्भात विचारणा केली असता नोटबंदीनंतर लगेच पाचशे व दोन हजार रूपयाच्या नोटा चलनात आल्या. यातील काही नोटांचा रंग उडत असल्याची चर्चा होती. नोटा बदलून द्याव्यात, अशी एकही तक्रार जिल्ह्यातील बँकांकडे आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Five hundred, two thousand notes blew out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.