शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम; मतदार जागृती कार्यक्रम ग्रामस्थांनी थांबवला

By विजय पाटील | Updated: December 15, 2023 16:08 IST

विविध घोषणा देत कौठा येथे मतदार जनजागृतीपर कार्यक्रम थांबविला

हिंगोली: ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देत वसमत तालुक्यातील कौठा येथे ईव्हीएम मशीन संदर्भातची माहिती व मतदार जनजागृतीवर आधारीत शासनाचा नियोजित कार्यक्रम शुक्रवारी ग्रामस्थांनी थांबविला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सरकारने कोणताही शासकीय कार्यक्रम गावात घेऊ नये, असे म्हणत ग्रामस्थांनी शासकीय कार्यक्रमांना विरोध दर्शविला.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दोन दिवसांपासून आवाहन करण्यात येत आहे. शासनाच्या सुचनेनुसार ग्रामीण भागात कार्यक्रम घेतले जात आहेत. ठरल्याप्रमाणे १५ डिसेंबर रोजी वसमत तालुक्यातील कौठा येथे सकाळी दहा वाजेदरम्यान पंचायत समिती व तहसील कार्यालयाचे काही कर्मचारी ईव्हीएम मशीन संदर्भात माहिती देण्यासाठी कौठा येथे आले होते. परंतु ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणताही कार्यक्रम गावात घेतला जाणार नाही, असे म्हणत ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देण्यात आली.

यापूर्वी विकसीत भारत संकल्प यात्रा थांबविली...यापूर्वी विकसित भारत संकल्प यात्रा कौठा ग्रामस्थांच्या वतीने थांबविण्यात आली होती. याहीवेळी विविध घोषणा देऊन शासकीय कर्मचाऱ्यांना परत पाठवले होते. शुक्रवारी शासनाचा ईव्हीएम संदर्भात जनजागृतीपर  कार्यक्रम घेण्यासाठी मंडळ अधिकारी ए. एस. शिंदे, पथकप्रमुख आर. डी. बोचरे, तलाठी शुभांगी जाधव, ग्रामसेवक डी. के. आजादे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले होते. परंतु ग्रामस्थांनी शासकीय कार्यक्रमाला विरोध दर्शविला. गावात मागच्या बारा दिवसांपासून आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू असून मागील महिन्यातच ग्रामस्थांनी गावात ‘राजकीय पक्ष आणि निवडणुकीवर बहिष्कार’ असे फलक लावले आहे. तसेच निवेदनही उपविभागीय अधिकाऱ्या दिले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकार