शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हट्टा परिसरात आखाड्यांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:27 IST

येथील सावंगी रोडवरील एरिगेशन कॅम्पच्या उत्तरेकडील आखाड्यांना व नवीन वसाहतीला आग लागली. सदरील आग हट्टा ते सावंगी वीज वाहिनीवर तारांचा स्पर्श झाल्याने परिसरातील गवत पेटत गेले व जोराच्या वाऱ्यामुळे परिसर आगीने कवेत घेतल्याचे सांगितले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कहट्टा : येथील सावंगी रोडवरील एरिगेशन कॅम्पच्या उत्तरेकडील आखाड्यांना व नवीन वसाहतीला आग लागली. सदरील आग हट्टा ते सावंगी वीज वाहिनीवर तारांचा स्पर्श झाल्याने परिसरातील गवत पेटत गेले व जोराच्या वाऱ्यामुळे परिसर आगीने कवेत घेतल्याचे सांगितले जाते.परिसरातील आखाडे, कडब्याच्या गंजी, झोपडे, तुºहाट्या, पºहाट्या, जळतन आदीला आग लागली. दुपारची वेळ व वर्दळ नसल्याने आग लागल्याचे लक्षात आले नाही. सदरील आग लागताच शेख सादीक, नंदराज दीक्षित यांनी अग्निशमन पथक व हट्टा पोलिसांना माहिती कळविली. परिसरातील आखाड्यात नंदराज दीक्षित यांचे शेड, शेषराव गलांडे, बेगाजी शिंदे, दत्तराव पारटकर, गंगाधर पारटकर, मारोतराव चट्टे, गंगाधर चट्टे आदींच्या झोपड्या, कडबा, शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. जनावरासाठी ठेवलेला जवळपास ५ हजार कडबा जळाला. आगीचे रौद्ररूप पाहता परिसरातील नागरिक शेख बशीर, शेख इरशाद, गोविंद कंगळे, राजू अंबेकर, शेख इरशाद, नारायण पारटकर, हरिदास चट्टे, के.एम.चट्टे, शेख इलियास, अभिजीत देशमुख, पठाण, बाबा भांडे, हरिदास चट्टे, शेख चाँद, शेख वाजेद आदींनी परिश्रम घेतले.अग्निशमन दल आल्यानंतर आग पूर्णत: आटोक्यात आली. तब्बल दोन तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझविली. घटनास्थळी बीट जमादार इमरान सिद्दीकी, संदीप बोचरे, ग्रा.पं.चे रविराज देशमुख, शेख खालेद, के.एम. चट्टे आदींनी भेट दिली. आगीच्या घटनेमुळे कडब्याच्या गंजीतून साप निघाला. त्यामुळे धावपळ वाढली. घटनास्थळ गावाच्या बाहेर असल्याने मोठे संकट टळले. यावेळी बघ्याची गर्दी जमली होती. जनावरांचे वैरण, शेतीपयोगी साहित्य जळाल्याने शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामा करून त्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :fireआगHingoliहिंगोली