शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:49 AM

येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा कोषागार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर न.प. इमारत, नाट्यगृह, शेतकरी भवन, शिवाजीराव देशमुख सभागृहाची पायाभरणीही करण्यात आली.

ठळक मुद्देहिंगोली : जिल्हा कोषागार कार्यालयाचे उद्घाटन

हिंगोली : येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा कोषागार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर न.प. इमारत, नाट्यगृह, शेतकरी भवन, शिवाजीराव देशमुख सभागृहाची पायाभरणीही करण्यात आली.गांधी चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमासह इतर ठिकाणी पालकमंत्री दिलीप कांबळे, जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, आ.तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ एच.पी.तुम्मोड, माजी आ.गजानन घुगे, शिवाजी जाधव, नगरसेवक गणेश बांगर, अनिल नेनवाणी, उमेश गुट्टे, नाना नायक, बिरजू यादव, अनिता सूर्यतळ, मुख्याधिकारी रामदास पाटील, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे आदी उपस्थित होते.यावेळी मुनगंटीवार म्हणाले, मराठवाड्याचा जावई म्हणून मी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी देण्याचे जे आश्वास दिले होते. त्यापैकी आतापर्यंत ४३ कोटी दिले असून उर्वरित सात कोटींचा निधी फेबु्रवारीत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. हिंगोली शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन हम साथ साथ है या चित्रपटाच्या नावासारखे काम करणे गरजेचे असून तसे हिंगोली पालिकेतील चित्रही आहे. प्रत्येकांनी हम आपके है कोण असे न म्हणता, राजकीयद्वेष, जात-पात बाजूला सारून विकासासाठी सदैव एकत्र आले पाहिजे असे अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले. अनुशेषासाठी आ.मुटकुळे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक करून जलेश्वर तलावाच्या अतिक्रमणधारकांच्या प्रश्नातही मदतीचे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री कांबळे म्हणाले, निधी जाहीर केला अन् तो दिला असे होतच नसल्याचे बहुदा दिसते. मात्र मुनगंटीवार यांनी शब्द पाळला. जलेश्वर तलावाचा विकास पुनर्वसनानंतरच करू, असेही ते म्हणाले.यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शहरासह जिल्ह्याचा विकास भाजपच्या काळातच होत असल्याचे सांगितले. तर अंतर्गत रस्त्यांचे १0२ कोटी, नर्सी नामदेवला २५ कोटी मिळतील, असा विश्वास दिला. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानून जलेश्वर तलाव विकासासाठी निधीची मागणी केली. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. आभार नगर अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी मानले.अनेकांची पाठया कार्यक्रमास शहरातील अनेक नगरसेवकांनी पाठ दाखविल्याचे दिसून आले. सर्वपक्षीय एकी सांगितली जात असली तरीही त्यांची अनुपस्थिती मात्र जाणवत होती.वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदनहिंगोली शहरातील कै. शिवाजीराव देशमुख यांचे नवीन सभागृह इमारतीचे बांधकाम केले जात आहे. सदरील सभागृहाचे लोकार्पण करताना कै. शिवाजीराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मिलींद उबाळे, विशाल इंगोले, शिवाजी ढाले, रवी पाईकराव, अ‍ॅड. हर्ष बनसोडे आदींनी केली.तसेच ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी निवृत्ती वेतन व इतर विविध मागण्या मंजूर कराव्यात. यासंदर्भाचे निवेदन महाराष्ट राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तर्फे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. निवेदनावर युनियनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मांडगे, जिल्हा सचिव ओमप्रकाश बनसोडे यांच्यासह पदाधिका-यांची स्वाक्षरी आहेत.दिलीपराव मित्र !४उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण हे राष्टवादीचे असले तरीही आमचे मित्र आहेत. राजकारणाच्या पलीकडचे हे संबंध आहेत. मात्र कुणी त्यावर काय अर्थ काढत असेल तर खुशाल काढा. ते मित्रच राहतील. अशी गुगली पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी टाकली.

टॅग्स :HingoliहिंगोलीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार