शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ग्रामीण रुग्णालय नवीन इमारतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:20 IST

तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे नव्याने बांधकाम केलेल्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले हे स्थलांतर आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे कोणताही गाजावाजा, उद्घाटन न करताच करण्याची नामुष्की ओढवली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे नव्याने बांधकाम केलेल्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले हे स्थलांतर आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे कोणताही गाजावाजा, उद्घाटन न करताच करण्याची नामुष्की ओढवली.सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इमारत मिळाली आहे. रुग्णालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्याने सेनगावचे ग्रामीण रुग्णालय प्राथमिक औषधोपचार केंद्र बनले होते. ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे रुग्णांना सरळ रेफर करण्याचा उद्योग सेनगावात चालू आहे. ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात कोणत्याच सुविधा नसल्याने बाह्य व आंतर रुग्ण विभाग कायम ओस पडून राहत आहे. हा सर्व प्रकार नवीन इमारतीमध्ये रुग्णालय गेल्यानंतर थांबेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये पाच दिवसांपूर्वी कोणताही गाजावाजा न करता रुग्णालयाचा कारभार कार्यान्वित झाला; पंरतु या इमारतीमध्ये आवश्यक आधुनिक सुविधा, यंत्रसामुग्री, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाºयांची संख्या पुरेशी नसल्याने रुग्णालयाचा कारभार आहे त्या स्थितीच आहे.रुग्णालयात आवश्यक तातडीच्या सुविधा अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत. नवीन इमारतीमध्ये रुग्णालयाचा कारभार सलाईनवर चालणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सेनगाव ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकाºयांची सर्व पदे तातडीने भरुन ग्रामीण रुग्णालयात मिळणाºया सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी रुग्णांमधून होत आहेत.ट्रामा क्रेअर सेंटर देण्याची गरजसेनगाव तालुका दुर्गम भागात वसलेला तालुका आहे. अपघातग्रस्तांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा तालुक्यात हिगोलीशिवाय उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना वेळीच आरोग्य सुविधा, उपचार मिळाले नसल्याने उपचाराअभावी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगाव ग्रामीण रुग्णालयात ट्रामा क्रेअर सेंटर सुरू केल्यास अपघातग्रस्तांसाठी तातडीने उपचार मिळतील. सदर युनिट सेनगाव येथे सुरु करावे, अशी मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल