शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर सायकल वाटपाचा निधी केला वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:19 IST

अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. या मथळ्याखाली ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले. उशिराने का होईना मोफत सायकल वाटपचा निधी संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे गरजू मुलींच्या हाती लवकरच सायकल येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. या मथळ्याखाली ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले. उशिराने का होईना मोफत सायकल वाटपचा निधी संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे गरजू मुलींच्या हाती लवकरच सायकल येईल.मानव विकास कार्यक्रम योजने अंतर्गत शाळेपासून पाच किमी अंतरावरील मुलींना दरवर्षी मोफत सायकल वाटप करण्यात येतात. यावर्षी एकूण १ हजार ९५२ विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी मानव विकासकडून शिक्षण विभागाच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. परंतु हा निधी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला नव्हता. त्यामुळे मोफत सायकल वाटपाची पुढील प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी येत होत्या. उशिराने का होईना माध्यमिक शिक्षण विभागाला जाग आली. अन्् सायकल वाटपाचा निधी मुख्याध्यापक वर्ग करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शिक्षण विभागाची दिरंगाई व नियोजनाच्या अभावामुळे मात्र अर्धे शैक्षणिक वर्षे उलटूनही मुलींच्या हातात सायकली पडत नसल्याची ही समस्या मागील अनेक वर्षांपासून आहे. या कारणामुळे ग्रामीण भागातील मुलींची पायपीट होते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या खात्यावर मानव विकासकडून ६८ लाख ३२ हजारांचा निधी वर्ग करण्यात आला. संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर हा निधी आठ दिवसांपुर्वीच वर्ग केल्याची माहिती देण्यात आली आहे.फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव परिसरातील विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप न झाल्याने मुलींना शाळेत जाण्यासाठी रोज ३ ते ५ कि.मी. पायी ये-जा करावी लागत आहे. परिणामी, विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सायकल वाटप केल्या जात नसल्यामुळे पालकांतूनही संताप व्यक्त केला जात आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले, तरीही येथील परिसरातील मुलींना सायकल मिळाल्या नाहीत. परंतु आता शिक्षण विभागाकडून सायकल वाटपासाठी लागणार निधी वर्ग करूनही लवकर विद्यार्थिनींना सायकल मिळतील का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :CyclingसायकलिंगSchoolशाळा