शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे, खताचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By विजय पाटील | Updated: July 26, 2023 16:44 IST

बोगस कीटकनाशक औषधी व खत बियाणे विक्रीच्या कारवाईसाठी दिला होता इशारा

गोरेगाव (जि. हिंगोली) : बोगस खते, बियाणांसह जैविक तथा रासायनिक कीटकनाशके व तणनाशकांच्या विक्रीवर आंदोलने करूनही कारवाई होत नाही. असा आरोप करीत शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी २६ जुलै रोजी दुपारी दीड वाजेदरम्यान विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

बाजारपेठेत विक्री केल्या जात असलेल्या बोगस खत, बियाणांसह जैविक तथा रासायनिक कीटकनाशक व तणनाशकावर कारवाई करुन तपासणीमध्ये बोगस आढलेल्या उत्पादनाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांच्याकडून  १७ जुलै रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. बोगस व कालबाह्य कीटक व तणनाशक औषधाच्या विक्रीतून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सदर बाबीकडे कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची बाब नमूद करीत तसेच बोगस औषधा विक्री करणाऱ्या कंपन्यांवर व कृषी केंद्रांवर कारवाई का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर कारवाई न झाल्यास २६ जुलै रोजी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.

आत्मदहनाचा इशारा देऊनही याबाबत कृषी विभागाकडून कुठलीच दखल घेण्यात आली. त्यामुळे  २६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास अमोल खिल्लारी यांच्याकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायलर करीत एका तासात मागणीची दखल न घेतल्यास दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कुठेही आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देत दुपारी दीड वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर तात्काळ खिल्लारी यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर हिंगोली येथे हलविण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले. 

कारवाईच्या टाळाटाळीमुळे भडका...बाजारपेठेत विक्री होणाऱ्या बोगस खत, बियाणांसह जैविक तथा रासायनिक तणनाशक व कीटक नाशकांवर कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघर्ष संघटना यांच्याकडून आंदोलने केली जात आहेत. मात्र सदर बाबीची गांभीर्यपूर्वक दखल न घेता कृषी विभागाकडून केवळ औषध नमुने तपासणीसाठी पत्रके काढीत वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे. जिल्हा कृषी विभागाचा सदर दप्तर दिरंगाई कारभार बघता स्वाभिमानचे नामदेव पतंगे हे मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा देत मुंबईत दाखल झाले आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी