शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा काळजाचा ठोका चुकला! रात्री शेतात पिकांना पाणी देताना समोर बिबट्या उभा होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:17 IST

कळमनुरी तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! पोतऱ्यानंतर आता देववाडीतही दर्शन; शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल

- गंगाधर शितळेडोंगरकडा (कळमनुरी): कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आता हा धोका अधिकच वाढला आहे. शुक्रवारी रात्री देववाडी परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये आणि विशेषतः रात्री शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रबी हंगामातील पिकांना वाचवण्यासाठी रात्रभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यासमोर आता स्वतःचा जीव वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गव्हाच्या शेतात 'काळा'शी सामना देववाडी येथील शेतकरी गजानन टारफे हे शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्याच वेळी त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसून आला. समोर साक्षात मृत्यू उभा असल्याचे पाहून टारफे यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या ओरडण्यामुळे आणि शेजारील शेतकऱ्यांच्या आवाजामुळे बिबट्या तिथून पसार झाला, मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

वन विभागाची कसरत सुरूचपोतरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाने तिथे ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावले आहेत. मात्र, बिबट्या अद्याप पिंजऱ्यात अडकलेला नाही. आता देववाडीतही बिबट्या दिसल्याने वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. वन विभागाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर सतर्कतेचे संदेश पाठवून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

बळीराजा संकटात सध्या रबी हंगामातील गहू आणि इतर पिकांना पाणी देण्याचे काम जोरात सुरू आहे. अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी आखाड्यावरच मुक्कामी असतात. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर वाढल्याने शेतात जाणे धोक्याचे झाले आहे. "पिकं वाचवली तर पोट भरेल, पण जीवच राहिला नाही तर काय करणार?" असा आर्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard sighting terrifies farmer irrigating field; life-threatening encounter!

Web Summary : A farmer in Kalmnuri had a close encounter with a leopard while irrigating his wheat crop at night. The incident has created fear among farmers who are struggling to protect their crops. The forest department is trying to capture the leopard, but farmers are questioning their safety.
टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरीHingoliहिंगोली