शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

सीबीनॅटद्वारे १००३ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:42 IST

जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले.पूर्वी संशयित क्षयरोग रूग्णांची थुंकी तपासण्यासाठी रूग्णांना मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत असे. त्यामुळे रूग्णाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागे. शिवाय उपचार सुरू होण्यासही वेळ लागे. मात्र आता सीबनेटद्वारे दोन तासांतच क्षयरोगाचे निदान होत आहे. त्यामुळे रूग्णांवरत तत्काळ उपचार करण्यास मदत होत आहे. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे. जिल्हा रूग्णालयातील सीबीनेट यंत्राद्वारे क्षयरोगाचे लवकर निदान होण्यास मदत होत आहे. त्यामुळे रूग्णांना तात्काळ व वेळेत उपचार मिळत आहेत. अत्याधुनिक यंत्राद्वारे वर्षभरात १००३ संशयित क्षयरोग रूग्णांची यंत्राद्वारे तपासणी केली. पूर्वी दुर्धर समजला जाणारा, क्षयरोग पूर्णत: बरा होणारा आजार आहे. जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रामार्फत क्षयरोगाचा प्रसार वाढू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. क्षयग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून शहरासह ग्रामीण भागात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातआहे.ड्रग रेजीस्टंट १८ क्षयरूग्ण आढळून आले आहेत. हे रूग्ण क्षयरोगाच्या नेहमीच्या उपचार पद्धतीस प्रतिसाद देत नाहीत. त्यासाठी अशा रूग्णांना जास्त कालावधीचा उपचार द्यावा लागतो असे डॉक्टरांनी सांगितले. क्षयग्रस्त रूग्णांना पूर्वी आठड्यातून ३ वेळेस डोस द्यावा लागे. परंतु आता हा डोस डॉक्टरांच्या सल्यानुसार दरदिवशी दिला जात आहे. नियमित औषधांचे सेवन आरोग्याची काळजी घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेला डोस वेळेत घेणे महत्वाचे आहे. असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.९८५ रूग्णांचा शोध उपचार पद्धती४शहरासह ग्रामीण भागात क्षयरोग रूग्णांचा आरोग्य यंत्रनेद्वारे शोध घेतला जातो. त्यांना दिलेला डोस वेळेवर घेतला जातो किंवा नाही, तसेच औषोधोपचार पुरवठा केला जातो. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत गतवर्षी ९८५ क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.