शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन

By विजय पाटील | Updated: December 7, 2023 16:42 IST

मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून सरसकट कर्जमाफीची केली मागणी

हिंगोली : बँक कर्ज परतफेडीसाठी किडनी, डोळे, लिव्हर, विक्रीला काढूनही शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता परंत मुंबईहून परतलेल्या त्या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी करीत अन्नत्याग आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सेनगाव तालुक्यातील गोेरेगाव व परिसरात यंदा खरीप हंगामात पावसाचा खंड व ‘येलो मोझॅक’ सारख्या रोगामुळे पिकांचे प्रंचड नुकसान झाले. परिणामी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात उत्पन्न घट झाली. परंतु कुठल्याही प्रकारची सरकारी मदत किंवा पिकविमा परताव्याचा लाभ मिळाला नाही. त्यात सोयाबीन व कापूस पिकाला योग्य भावही मिळत नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर बँक कर्ज फेडायचे कसे ? असा प्रश्न उभा राहिला आहे. यास कंटाळून गोरेगावसह परिसरातील दहा शेतकऱ्यांकडून अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. गत महिन्यात अवयव विक्री आंदोलनासाठी संबंधित शेतकऱ्यांनी मुंबई गाठली होती. दरम्यान त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या निमंत्रित करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

७ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. यामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी ८ डिसेंबरपासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदर निवेदनावर गजानन कावरखे, रामेश्वर कवरखे, मदन कावरखे, सुनील मधुरवाड, संजय मुळे, अक्षय पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अवयव विक्रीवरही ठाम ...सततच्या दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात होरपळला जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्याच्या घटना घडत आहेत. बिकट परिस्थिती बघता शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे. पिकविमा, शेतमाला योग्य भाव तसेच सरसकट कर्जमाफी आदी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल. बँक कर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीवरही आम्ही ठाम असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी