हिंगोली: वीजचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. शेजाऱ्याकडून वीज घेतली, तरी त्या ग्राहकावर वीजचोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे कोणीही असा प्रकार करू नये. रितसर वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ अंतर्गत वीजचोरी करणाऱ्या ग्राहकावर गुन्ह्याची नोंद केली जाऊ शकते. तेव्हा कोणीही असा प्रकार करू नये. याचबरोबर, कोणी जर तारांवर आकडे टाकून विजेची चोरी करीत असेल, तर त्याच्यावरही रीतसर गुन्ह्याची नोंद केली जाऊ शकते. नियमानुसार वीज जोडणी घेऊन महावितरणला सहकार्य करावे. वीजचोरी करणे हा गंभीर गुन्हा आहे. महावितरणचे लाइनमन ज्या वेळेस आपल्याकडे येतात, तेव्हा त्यांना वीज मीटर अथवा इतर समस्यांबाबत सांगावे. लाइनमन आपल्या समस्यांची सोडवणूक करतील, परंतु माहिती नसताना कोणीही कायदा हातात घेऊ नये, असेही महावितरणने सांगितले.
खबरदार वीजचोरी कराल तर...
स्वत:चे मीटर बिघडले आहे. घरात उजेड राहण्यासाठी शेजाऱ्याकडून कोणी वीज घेत असेल आणि ते जर निष्पन्न झाले, तर त्या ग्राहकावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाऊ शकते. यासाठी कोणीही विजेची चोरी करू नये. एक दिवस अंधारात राहिले तरी चालेल, परंतु असे प्रकार करू नये.
कायदा काय सांगतो?
विद्युत कायदा २००३ मध्ये अंमलात आला आहे. या कायद्यान्वये कलम १२६ अन्वये वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध रीतसर कारवाई केली जाऊ शकते. तेव्हा कोणीही असा प्रकार करू नये. वीज मीटर बिघडला असेल, तर अथवा काही अडचण असेल, तर महावितरण कंपनीशी संपर्क साधावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये.
वीजचोरी करणे गुन्हाच आहे...
तारावर आकाडे टाकून असो की, शेजाऱ्याकडून गुपचूपपणे वीज घेणे हा गंभीर गुन्हा आहे. कलम १२६ अंतर्गत त्या ग्राहकाकडून महावितरणच्या वतीने गुन्ह्याची नोंद करता येते. घरातील, शेतातील वीज मीटर बंद झाले असेल, अथवा बिघडले असेल, तर कोणीही त्या मीटरला हात लावू नये. खासगी व्यक्तीला आणून मीटर दुरुस्ती करू नये. नियमानुसार महावितरण कंपनीला याबाबत कळवावे. महावितरणचे लाइनमेन हे तक्रार केल्यानंतर जागेवर येतील अन् मीटर दुरुस्त करुन देतील. विनाकारण कोणीही मीटरमध्ये छेडछाड करू नये.
प्रतिक्रिया
महावितरणला सहकार्य करावे...
वीजचोरी करून कोणीही कायदा हातात घेऊ नये. असे प्रकार जर उघड झाले, तर कलम १२६ अंतर्गत त्या ग्राहकावर गुन्हा दाखल होऊ शकतो. दुसरीकडे विजेचे बिल बाकी राहिले, तर ते भरून महावितरणला सहकार्य करावे. काही अडचण असेल, तर महावितरणशी संपर्क साधावा.
- रजनी देशमुख, कार्यकारी अभियंता
महावितरणकडून वर्षभरात झालेली कारवाई...
शहर प्रकरण युनिट चोरी दंडवसुली
ग्रामीण प्रकरण युनिट चोरी दंडवसुली
युनिट चोरी