शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मालकाचे पैसे ऑनलाईन रम्मीत हारला; मित्राच्या सल्ल्याने केलेला चोरीचा बनाव आला अंगलट

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: August 30, 2023 17:26 IST

मित्रांचा सल्ला घेतला अन् पोलिसांच्या जाळ्यात फसला

हिंगोली : मालकाचे ५० हजार रूपये ऑनलाईन रम्मीमध्ये हारला. आता मालकाला काय उत्तर द्यायचे? म्हणून मित्राच्या मदतीने एकाने चोरट्यांनी जबरी पैसे काढून घेतल्याचा बनाव केला. मात्र हा बनाव पोलिसांच्या तपासणीत उघड झाला. आता पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोलीतील श्याम नेनवाणी यांचा डेली निड्सचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे नितीन पंजाबराव चिपाडे  (रा. जोडतळा ता. हिंगोली) हा कामाला आहे. तो डेली निड्सचा माल डिलिव्हरी करतो. २८ ऑगस्ट रोजी त्याने माल डिलिव्हरी केली. यात ५० हजार रूपये आले होते. त्यानंतर रात्री तो जोडतळा ते माळहिवरा रोडने घरी जात होता. यावेळी चोरट्यांनी रस्ता अडवून जवळचे ५० हजार रूपये बळजबरीने काढून घेतल्याची तक्रार देण्यासाठी तो बासंबा पोलिस ठाण्यात दाखल झाला. जबरी चोरीचे प्रकरण असल्याने सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांनी तत्काळ चोरट्यांचा शोध घेण्याची तयारी सुरू केली. मात्र नितीन चिपाडे यांच्या बोलण्यात विसंगती येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता यात डेली निड्सचा माल डिलिव्हरी करून आलेले ५० हजार रूपये नितीन चिपाडे हा ऑनलाईन रम्मीत हरल्याचे समोर आले. मालकाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्याने जबरी चोरीचा बनाव केला असल्याचेही स्पष्ट झाले. 

मित्रांचा सल्ला घेतला अन् पोलिसांच्या जाळ्यात फसलायात नितीन चिपाडे याने मालकाचे ५० हजार रूपये ऑनलाईन रम्मीत हरल्याची बाब मित्र सतीश शंकर थोरात व अविनाश गौतम डोंगरदिवे ( दोघे रा. जोडतळा) यांना सांगितली. त्यांनीच जबरी चोरीची खोटी फिर्याद देण्याबाबतची कल्पना दिली. मात्र पोलिसांच्या तपासणीत त्यांचा भांडाफोड झाला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गुलाब खरात यांच्या फिर्यादीवरून नितीन चिपाडे, सतीश थोरात, अविनाश डोंगरदिवे यांचेवर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी