शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर खाद्यतेल स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

हिंगोली : कोरोना काळात खाद्यतेलाच्या भडकलेल्या दरवाढीची झळ सर्वसामान्यांना बसत होती. आता जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत खाद्यतेलाची आवक वाढल्याने ...

हिंगोली : कोरोना काळात खाद्यतेलाच्या भडकलेल्या दरवाढीची झळ सर्वसामान्यांना बसत होती. आता जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत खाद्यतेलाची आवक वाढल्याने खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. हिंगोली शहरात १६० रुपये प्रतिकिलो मिळणारे सोयाबीन तेल आता १४० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे.

कोरोनामुळे जागितक बाजारपेठेतून होणारी खाद्यतेलाची आवक कमी होत गेली होती. त्यामुळे देशभरात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीही चांगल्याच भडकल्या होत्या. अगोदरच कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. कामगारांच्या हाताचे काम गेले. शासनाने जाहीर केलेली मदतही वेळेत पोहोचली नसल्याने घर चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. आता निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप रोजगाराचा प्रश्न कायम आहे. अशात खाद्यतेलाच्या किमती भडकल्याने सर्वसामान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. जेवणातून चमचमीत पदार्थ गायब झाले होते. आता जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारात खाद्यतेलाची आवक होत असल्याने खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याचे बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. हिंगोली बाजारपेठेत गुरुवारी करडई खाद्यतेलवगळता इतर खाद्यतेलांच्या किमतीमध्ये जवळपास १८ ते २० रुपयांपर्यंत घट झाल्याचे किराणा दुकानदार अनिलकुमार जैन यांनी सांगितले.

गृहिणींचे बजेट कोलमडले

खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते. जेवणातून तळीव पदार्थ गायब झाले होते. अर्धे बजेट खाद्यतेल खरेदीत खर्च होत असल्याने चांगलीच काटकसर करावी लागत आहे. आता किंचित घट झाली असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल

पूर्वी करडईचे उत्पादन घेतले जात होते. त्यामुळे वर्षभर पुरेल एवढे करडईचे तेल घाण्यावरून काढून आणले जात होते. मात्र, करडईचे पीक काढण्यासाठी फारसे मजूर मिळत नसल्याने आता पीक घेणे कमी झाले आहे. त्यामुळे आता विकतचे तेल आणावे लागत आहे.

- संतोष कोल्हे, कामठा फाटा

सूर्यफूल, शेंगदाणा, करडईचे पीक चांगले येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी वर्षभर पुरेल एवढे खाद्यतेल राहात होते. आता सर्व शेतकरी नगदी पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे विकतचे तेल आणावे लागत आहे.

- सुरेश पाईकराव, येलकी

खाद्यतेलाचे आधीचे व आताचे दर

सोयाबीन १६० - १४०

सूर्यफूल - १८० - १६०

शेंगदाणा १८० - १६०

पामतेल १५० - १३०

करडई २०० - २००