शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; जमिनीतून आला गूढ आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 17:09 IST

पांगरा शिंदेसह परिसरात मागील सहा वर्षांपासून गूढ आवाजासह अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

- इस्माईल जाहगीरदारवसमत (जि. हिंगोली):तालुक्यातील पांगरा शिंदेसह परिसरात १६ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यादरम्यान भूगर्भातून गूढ आवाजही आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या भूकंपाची नोंद झाली नसली तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दुजोरा दिला आहे.

पांगरा शिंदेसह परिसरात मागील सहा वर्षांपासून गूढ आवाजासह अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले असून, यापूर्वी १५ जुलै रोजीही दोन वेळा तर नोव्हेंबर महिन्यातही दोन वेळा भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यानंतर १६ डिसेंबरच्या दुपारी भूगर्भातून गूढ आवाज आला आणि जमीन हादरली. या भूकंपात नुकसान झाले नाही. यापूर्वी झालेल्या भूकंपाचे केंद्र पांगरा शिंदे होते. त्यामुळे या भूकंपाचे केंद्रही पांगरा शिंदेच असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण...पांगरा शिंदे परिसरात मागील सहा वर्षांपासून अधूनमधून भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत. तसेच भूकंपाचे धक्केही जाणवत आहेत. यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने याचा शोध लावणे गरजेचे आहे.- भागवत शिंदे, उपसरपंच, पांगरा शिंदे

टॅग्स :EarthquakeभूकंपHingoliहिंगोली