शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

राज्यव्यापी संपामुळे कार्यालयांत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:26 IST

राज्यव्यापी पुकारण्यात आलेल्या लाक्षणीक संपात ७ आॅगस्ट रोजी विविध संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील अ‍ेनक महविद्यालयांनी संपात सहभागी होऊन कामबंद ठेवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान झाले. तर काही संघटनांनी संपास पाठींबा देऊन काळ्याफिती लावून कामकाज केले. तर काहींनी कामबंद ठेवले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यव्यापी पुकारण्यात आलेल्या लाक्षणीक संपात ७ आॅगस्ट रोजी विविध संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील अ‍ेनक महविद्यालयांनी संपात सहभागी होऊन कामबंद ठेवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान झाले. तर काही संघटनांनी संपास पाठींबा देऊन काळ्याफिती लावून कामकाज केले. तर काहींनी कामबंद ठेवले होते.हिंंगोली येथील जि. प. कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी, महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन नागपूर संपात सहभागी होऊन विविध मागण्यां शासनाने मान्य करून न्याय देण्याची मागणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी संपात सहभागी झाले. राज्यव्यापी संपात ग्रामसेवक युनियन, नर्सेस संघटना, विस्तार अधिकारी संघटना, आरोग्य संघटना, कृषि तांत्रिक संघटना, लिपीक वर्गीय संघटना, पशु चिकित्सा संघटना, बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना, हिवताप निर्मुलन संघटना आदी विविध संलग्न संघटना सहभागी झाल्या आहेत. संपामध्ये अनेक संघटना सहभागी झाल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प होते. तर काही संघटनांनी संपास पाठींबा जाहिर करून काळ्याफिती लावून कामकाज केले. सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसह ५ दिवसांचा आठवडा करणे निवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मंजूर करावी, कंत्राटी पध्दत बंद करणे, अंशदायी पेंशन योजना रद्द करणे आदी मागण्यां आहेत. म संपाचा शाळा व महाविद्यालयांवरही परिणाम झाला. हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयाती कर्मचारी, शिवाजी महाविद्यालय, बाबुराव पाटील महाविद्यालयांतील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. सदर संपास जुक्टा, मुक्टा व एम.सी.व्ही.सी. संघटनेच्या सर्व सभासदांनी पाठींबा दिला. राज्य सरकारी कर्मचाºयांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला आदर्श महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी संपादमध्ये सहभागी झाले आहेत. संपामुळे महाविद्यालयीन कामकाजावर परिणाम झाला होता. या महाविद्यालयातील ५१ कर्मचारी संपात सहभागी झाले.राज्यव्यापी संपात विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती कार्यालय परिसरात एकच गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबदारी घेत पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोटपोलीस बंदोबस्त होता. संपात सर्व कर्मचारी सहभागी झाल्यामुळे अनेक कार्यालयातील कंत्राटी कर्मचाºयांनी कार्यालयीन कामकाज सांभाळले. आरोग्य विभाग, पाणलोट विभाग तसेच रोहयो विभागातील कंत्राटी कर्मचाºयांनी ही कामे हाताळली.औंढा कार्यालयातही शुकशुकाटऔंढा नागनाथ : येथे पंचायत समितीत जि.प.तर तहसील कार्यालयात महसूल कर्मचारी मंगळवारी दिवसभर संपावर गेल्याने दोन्ही कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. दोन्ही मिळून एकूण ८० च्या वर कर्मचारी संपावर गेले होते. शासनस्तरावरील प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात जि.प. व महसूल विभागाच्या वतीने संप पुकारला होता. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे व तहसील कार्यालयात तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर व्ही.सी. हातमोडे, एस.सी. पुरी, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, पी.बी. घाडगे, जी.के. पाटील, टी.बी. सरकटे, पी.एस. बोंढारे, जी.आर. गिनगीने, सी.एम. चव्हाण, जी.एन. वाघमारे, एस.व्ही. सातव, एच.एन. टारफे, आदी ३३ कर्मचारी पं.स. कार्यालयाचा प्रांगणात ठिय्या अंदोलन केले होते.सेनगाव तालूक्यातील शिक्षक संपावर४सेनगाव : महाराष्ट्र राज्य कर्मचारी समन्वय समितिने पुकारलेल्या संपात सर्व शिक्षक संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे सेनगाव तालूक्यातील अनेक शिक्षक मंगळवारपासून ९ आॅगस्टपर्यंत तीन दिवसांसाठी संपावर गेले आहेत. संपात शिक्षक संघटना सहभागी झाल्यामुळे सेनगावातील अनेक शाळा बंद होत्या. तर काही शाळांमध्ये फक्त शिक्षण सेवक काम करीत असल्याचे दिसून आले. मागण्या संदर्भाची निवेदने शिक्षकांनी पंचायत समिती सेनगाव येथे दाखल केली आहेत. सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी संपात सहभागी झाले असून सर्व एकत्रीत येऊन तालुक्यातील सर्व शिक्षकांना आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता उर्वरित सर्व शिक्षक उद्यापासून संपात सहभागी होणार असल्यामुळे शाळा शंभर टक्के बंद राहण्याची शक्यता आहे. संपामुळे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.वसमत येथे संप४वसमत : बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ संघटने ७ ते ९ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या संपात सहभागी झाले. संपामध्ये आय.वाय.कंठे, एस. के. हिवरे, एस. पी. जाधव, पी. एम. गुठ्ठे, बाबा कदम, नीलेश देशमुख, बी. पी. निकम, एस. एम. मुसळे, भीमराव अडकिणे, रमेश सोळंके, पी. टी. यादव, एस. एम. कºहाळे, गणेश जाधव, मारोती इंगोले, खेत्री, अविनाश भोसले, वसंत कदम, एम. के. मंदावाड यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले.कळमनुरी : विविध मागण्यांसाठी कर्मचाºयांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. या संपात कर्मचाºयांचा सहभाग असल्याने ७ आॅगस्ट रोजी कार्यालय ओस पडली होती. येथील तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय पंचायत समिती कृषी कार्यालय सहायक निबंधक सहकारी संस्थेसह आदी कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत. विस्तार अधिकारी संघटनाही संपात सहभागी असल्याचे विस्तार अधिकारी एस.टी. खंदारे यांनी सांगितले. जिल्हा परिषद अभियंता संघटनेने फक्त संपाला पाठिंबा दिला. ते संपात सहभागी नसल्याचे शाखा अभियंता आनंद पतो यांनी सांगितले. पंचायत समिती व तहसील कार्यालयात शुकशुकाट होता. सर्वच कर्मचारी संपात होते. टेबल खुर्च्या होत्या. कामानिमित्त कार्यालयात आलेल्या कर्मचाºयांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पं.स.चे कर्मचारी कार्यालयाबाहेर मंडप टाकून बसले होते. दिवसभर काहीही कामकाज झाले नाही. पं.स. मध्ये शेख सलीम ए.एन. टोकवार, बी.एन. गाजरे, पी.डी. पतंगे, ए.आर. छत्रपती, बी.डी. बागुल यांच्यासह ३९ कर्मचारी संपात सामील होते. तालुकास्तरावरील जवळपास सर्वच कार्यालयांत शुकशुकाट दिसून आला. सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे मात्र कामानिमित्त येणाºयांची मोठी गैरसोय झाली. ग्रामीण भागातील नागरिकांची फजिती झाली. सर्वच कर्मचारी संपात असल्यामुळे कार्यालयीन कामकाज सर्व ठप्प होते. नेहमी गजबजणाºया कार्यालयात शुकशुकाट होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा