लोकमत न्यूज नेटवर्कहट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथे बाजार चौक ते प्राथमिक आरोग्य केंद्रे व शाळेकडे जाणारा मुख्य कॅनलवरील सिमेंट रोड खचला असून रात्रीच्या वेळी अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. तीन वर्षांपूर्वी आमदार फंडातून हट्टा ग्रामपंचायतने हा रस्ता केला. अवघ्या तीन वर्षांत रस्ता खराब झाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे बाजूचा पाटबंधारे विभागाचा कॅनल फुटण्याची शक्यता आहे. पोलीस वसाहत व शेतीचे पाणी रोडवरून जात असल्याने रस्ता खचत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे.सूर्यदर्शन नाहीपोत्रा : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा परिसरात कालपासून सूर्यदर्शन नाही. दुपारी काही काळ ऊन पडल्यानंतर दोन वाजेपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. सायंकाळी उशिरापर्यंत भुरभुर व रिमझिम सुरूच होती.जमिनी खरडल्याकडोळी : सेनगाव तालुक्यातील कडोळी तसेच माझोड, भगवती, तपोवन, गारखेडा, सुरजखेडा, गुगुळपिंपरीसह विविध गावांत कालपासून बऱ्याच प्रमाणात पाऊस होत आहे. परिसरातील काही शेतामध्ये पाणी साचल्याने पेरण्यासुद्धा शिल्लक आहेत. तर ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरूवात झालेल्या पावसामुळे शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेल्या शेतमजुरांना घरी परतावे लागले.सवन्यात नुकसानसवना: सेनगाव तालुक्यातील सवना येथे शनिवारी पुन्हा धुवांधार पावसाने हजेरी लावली. यात ओढ्याकाठच्या जमिनीत पाणी घुसल्याने पेरणी केलेले सोयाबीन तिसºयांदा वाहून गेले आहे.
हट्टा येथे पावसाच्या परीक्षेत रस्ते नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:01 IST