विविध विभागांत वेगवेगळी रंगरंगोटी आहे. त्यात एकरूपता दिसत नाही. सर्व ठिकाणी सारखेपणा असावा, एका विभागाच्या सर्व कपाटांचाही रंग एकच असावा. प्रत्येक ठिकाणी कचरा डस्टबिनमध्येच टाकावा, जि.प.च्या चारही बाजूंनी पडलेला कचरा दोन दिवसांत हटला पाहिजे. किरकोळ दुरुस्तीची अनेक कामे झाली नसल्याने इमारत चांगली दिसत नाही. ती करण्यासही आदेशित केले.
कर्मचाऱ्यांची धावपळ
दोन दिवसांपूर्वीच तपासणीत कर्मचारी न आढळल्याने नोटिसा काढण्याचा प्रकार घडला होता. आज पुन्हा दैने यांनी दौरा केल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. जागेवर नसलेले अचानक अवतरत असल्याचे दिसत होते. यावेळी त्यांच्यासमवेत अति. मुकाअ अनुप शेंगूलवार, उपमुकाअ ए. एल. बोंद्रे, कार्यकारी अभियंता तांबे, अभियंता सदावर्ते यांचीही उपस्थिती होती. यातील बहुतेक सूचना बांधकाम विभागाला दिल्या असून काही बाबी त्यांनाही माहिती नसल्याने त्यांनी धारेवर धरल्याचे दिसत होते.