शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धूम स्टाईल थरार! पैश्यांची बॅग, सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: March 21, 2023 18:58 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; सोन्याची चैन व पैलुटारू सावरखेडा, खानापूर मार्गे कळमनुरीकडे वेगाने जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस पथकाने त्या दिशेने धाव घेत पाठलाग केला.शाची बॅग केली होती लंपास

हिंगोली : धूम स्टाईलने गळ्यातील सोन्याची चैन व पैशाची बॅग घेऊन दुचाकीवरून पळ काढणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच वेगाने गाठत पकडले. हा थरार २० मार्च रोजी दुपारी घडला. 

हिंगोली शहरात २० मार्च रोजी करण भीमराव मुळे (रा.चौंडी काठोडा ता. औंढा) हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. ते भारत विद्यालयाजवळ आले असता दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्याजवळील पैशाची बॅग हिसकावून पळ काढला. त्यानंतर काही वेळातच रेल्वे स्टेशन परिसरातील रोडवरून जाणाऱ्या शेख सोहेल शेख चाँदपाशा (रा. हिंगोली)  यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याची चैन हिसकावल्याची घटना घडली होती. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

दरम्यान, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी लुटारूंचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत लुटारूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी यातील एक लुटारू सावरखेडा, खानापूर मार्गे कळमनुरीकडे वेगाने जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस पथकाने त्या दिशेने धाव घेत पाठलाग केला. तसेच पुढे कळमनुरी पोलिसांनाही सूचना दिल्या होत्या. दोन्ही पथकाने सुशिल बबन वाकळे (रा. बासंबा) यास ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता दोन्ही घटनेत सहभाग असल्याचे त्याने कबुली दिली. तसेच यात संतोष शंकर जाधव, आशुतोष निळकंठ ढाले (सर्व रा. बासंबा) यांचा सहभाग असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून इतर दोघांना पोलिसांनी कारवाडी भागातून ताब्यात घेतले. 

१ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्तयावेळी पोलिसांनी आरोपीकडून रोख २६ हजार २०० रूपये, एक मोबाईल व एक दुचाकी असा एकूण १ लाख ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, आजम प्यारेवाले, प्रमोद थोरात, शेख जावेद यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली