शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अवयव विकण्यासाठी धनी गेले मुंबईला; आम्ही कुणासाठी जगावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:16 IST

Hingoli News: शेतमालाला भाव मिळत नाही, पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत, या व इतर मागण्यांसाठी गोरेगाव व परिसरातील शेतकरी मुंबईला गेले आहेत. धनी जवळ नाही, प्रशासनही दखल घ्यायला तयार नाही.

गोरेगाव (जि. हिंगोली) - शेतमालाला भाव मिळत नाही, पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत, या व इतर मागण्यांसाठी गोरेगाव व परिसरातील शेतकरी मुंबईला गेले आहेत. धनी जवळ नाही, प्रशासनही दखल घ्यायला तयार नाही. आता आम्ही जगून काय उपयोग, असे म्हणून शेतकऱ्यांच्या कुटुंबातील  सदस्यांनी रविवारी गोरेगाव अपर तहसील कार्यालयासमोर  मुलाबाळांसह मागणीचे निवेदन गेटला चिकटविले.  

कुटुंब धडकले तहसील कचेरीवर-अनेकांनी उसनवारी करून खरीप पिकांची पेरणी केली. परंतु उसनवारी फिटेल एवढे पैसे उत्पन्नातून निघाले नाहीत. त्यामुळे अवयव विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. -२२ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी ‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे पाठविला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी गोरेगाव व परिसरातील शेतकरी स्वत:ला श्रद्धांजली वाहून मुंबईला गेले.   - याबाबत प्रशासन दखल घ्यायला तयार नसल्याने सदर शेतकऱ्यांच्या पत्नी-मुलाबाळांसह कुटुंबातील मंडळींनी रविवारी गोरेगाव येथील अपर तहसील कार्यालयासमोर घोषणा देत सरकारचा निषेध केला.

निवेदनात तीन वर्षांच्या मुलांचीही नावे-अवयव विक्रीकरिता शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसह सिद्धी कावरखे (३), भक्ती कावरखे (८), आदित्य कावरखे (९), आराध्या कावरखे (४), रोहन मुळे (९) या तीन ते नऊ वर्षे वयोगटांतील लहान मुलांची नावे निवेदनामध्ये नमूद करण्यात आली.   - प्रत्येकी किडनी ६० हजार रुपये, लिव्हर ५० हजार रुपये, डोळे २० हजार रुपये दराचा उल्लेखही करण्यात आला आहे. निवेदनावर वैशाली कावरखे, संगीता पतंगे, रेखा मुळे, अनिता कावरखे, शोभा कावरखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.   

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली