शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपार करूनही सुधारणा होईना, आता कारागृहाचा दाखविला रस्ता; ४ महिन्यात ११ जण स्थानबद्ध

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: March 24, 2023 16:35 IST

सतत गुन्हे करणाऱ्यांविरूद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्यान्वे प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे.

हिंगोली : प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने एकास एम.पी.डी.ए. कायद्यातंर्गंत थेट कारागृहाचा रस्ता दाखविला आहे. या बाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. 

विशाल सुरेश सांगळे (रा. पोळा मारोती जवळ, हिंगोली) असे एमपीडीए कायद्यान्वे कारवाई करून १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो मागील काही वर्षांपासून हिंगोली शहर व बासंबा पोलिस ठाणे हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहे. त्याचेवर खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग, दंगा करणे, मारमारी असे गंभीर स्वरूपाचे १२ तर गुन्हे तर अदखलपात्र ३ गुन्ह्याची नोंद आहे. तो सतत गुन्हे करीत असल्याने समाजासाठी धोकादायक बनला होता. गुन्हेगारी कृतीपाासून परावृत्त व्हावे म्हणून त्याचेविरूद्ध ३ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याचे आदेशही निघाले होते. मात्र तरीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत होता. त्याचेविरूद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वे कारवाई करावी, असा प्रस्ताव हिंगोली शहर पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावाची तपासणी करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार प्रस्तावाची पडताळणी करून जिल्हाधिकारी पापळकर यांनी त्याचेविरूद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वे कारवाई करून एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश निर्ममित केले आहेत.   

चार महिन्यात ११ जणांना केले स्थानबद्धपोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्यांविरूद्ध कार्यवाहिची कडक भूमिका घेतली आहे. सतत गुन्हे करणाऱ्यांविरूद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्यान्वे प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. मागील चार महिन्यात ११ जणांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वे कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली