जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुली व अनुसूचित जाती व जमातीच्या, तसेच दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात येतो. यासाठी अनेक अडचणी व पालकांच्या प्रश्नांना सामाेरे जावे लागते. यासंबंधी शिक्षण सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून तरतूद करण्याची मागणी करण्यात आली; परंतु अद्यापही मागणी मान्य झाली नसल्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील जिल्हा परिषदमधील शाळेतील सर्वच जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर, जिल्हा सरचिटणीस माधव वायचाळ, जिल्हा कार्याध्यक्ष इर्शाद पठाण, जिल्हा कोषाध्यक्ष शंकर सरनाईक, मधुकर खणके, उत्तम जोगदंड, विनायक भोसले, किशन घोलप, रामराव वराड, विठ्ठल पवार यासह पदाधिकारी उपस्थित होते.