शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा धाडसी चोरी; तीन लाखाचे दागिने व पन्नास हजार रोकड लंपास

By विजय पाटील | Updated: August 26, 2023 13:46 IST

ऐन खरीप हंगामात भर दिवसा चोरी झाल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा धाडशी चोरी होऊन जवळपास तीन लाखांचे दागिने आणि पन्नास हजार रोख रुपये चोरीला गेले. यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुसेगाव येथील शेतकरी पुरभाजी पातळे हे नेहमीप्रमाणे तारीख २५ ऑगस्ट  रोजी सकाळी आपल्या कुटुंबासोबत शेतात गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा  टॉवरचे दार तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले अडीच लाखाचे दागिने व रोख पन्नास हजार रुपये असा एकूण तीन लाखाचा ऐवज चोरांनी लंपास केला.

पुरभाजी पातळे यांच्या मुलाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यामुळे त्यांचे सोन्याचे दागिने घरीच कपाटामध्ये ठेवले होते. जेव्हा पातळे यांच्या पत्नी व सून शेतातून घरी आल्या तेंव्हा घराच्या एकाबाजूचा दरवाजा उघडलेला दिसला. त्यानंतर कपाटाचा देखील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. होता. हा प्रकार पाहून पत्नीने आपल्या पतीला फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. यानंतर मुलगा आणि पातळे हे घरी आल्यानंतर आपल्या घरी मोठी चोरी झाली असे समजले.  त्यांनी बाजूच्या लोकांना घरी चोरी झाल्याची माहिती दिली. लगेच गावातील काही लोकांनी नर्सी पोलिसांना कळविले. यानंतर तातडीने नर्सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे आणि जमादार चौधरी यांनी पुसेगाव येथे जाऊन घटनेचा पंचनामा केला. 

या प्रकरणी रात्री उशिरा शिवाजी पातळे  यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास नर्सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चिरमाडे व जमादार चौधरी हे करीत आहेत.

गावात भितीचे वातावरण....ऐन खरीप हंगामात भर दिवसा चोरी झाल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतीकामे करण्यासाठी जात आहेत. हीच संधी चोरटे साधत आहेत. एकीकडे निसर्ग साथ देत नाही. तर दुसरीकडे चोरटे धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली