लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील थोरला मठ संस्थान येथे शिवैक्य दिगंबर शिवाचार्य महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित पालखी सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शहराच्या मुख्य मार्गाने पालखी मिरवणूक काढण्यात आली.थोरला मठ येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सांब शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मिरवणूक शनिवारी काढण्यात आली. यात करबसव शिवाचार्य महाराज वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज शिवाचार्यांनी हजेरी लावली.शहराच्या मुख्य मार्गाने पालखी निघून थोरला मठ येथे धर्मसभेत परिवर्तीत झाली. मान्यवर शिवाचार्यांनी धर्मोपदेश दिला. पुण्यतिथीनिमित्त दिवसभर पारायण, रुद्राभिषेक, भजन, कितर्न, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. पालखी मिरवणूकीत मोठ्या संख्येने महिला भजनी मंडळ, भाविक सहभागी झाले होते.
पालखी सोहळ्यास भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:16 IST