कळमनुरी तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी हरभरा काढून गंजी लावली आहे, तर काही ठिकाणी हरभरा काढण्याच्या अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी गहू ओंबीच्या अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी गहू काढणीला आलेला आहे. या पावसामुळे गहू व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. गहू काढणीच्या अवस्थेत असताना, रिमझिम अवकाळी पाऊस झाल्यामुळे गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरुण तालुक्यात काही ठिकाणी फळपिकेही लावल्या जातात. या रिमझिम पावसामुळे टरबुजावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला असून, कारले, दोडके, टोमॅटो या फळ वर्ग मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात थंडीची लहर आलेली असून, या थंडीमुळे रब्बी व फळ पिकांचे नुकसान होत आहे. या थंडीमुळे बाहेर निघणे कठीण झाले आहे. फाेटाे नं.०९
रब्बी पिकांवर अवकाळी पावसाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:26 IST