अंकुश सदाशिव पायघन (रा. वडगाव) हे ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एम.एच. ३८ ए.बी. ४०८९ या दुचाकीवर जात होते. त्यांच्या दुचाकीवर पाठीमागे श्रीरंग रामराव पतंगे (रा. घोडा) बसले होते. त्यांची दुचाकी कामठा फाटा परिसरातील १३२ के.व्ही. सबस्टेशनजवळ आली असता दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकी रोडवर पाडली. यात पाठीमागे बसलेल्या श्रीरंग पतंगे यांना गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नारायण रामराव पतंगे (रा. घोडा) यांच्या फिर्यादीवरून एम.एच. ३८ ए.बी. ४०८९ दुचाकीचा चालक अंकुश सदाशिव पायघन (रा. वडगाव) याच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक ए.व्ही. मुपडे करीत आहेत.
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST