शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भगवा रुमाल टाकून मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश; शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 12:49 IST

Shiv Sena MLA Santosh Bangar: स्वत:च्या गळ्यात भगवा रुमाल टाकून मतदानावर प्रभाव पडेल, अशा पद्धतीने त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला.

हिंगोली : औंढा नागनाथ येथे नगरपंचायत निवडणुकीचे मतदान सुरू असताना प्रभाग क्र.५ मधील नागनाथ कनिष्ठ महाविद्यालय या मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश करून मतदारांवर प्रभाव पडेल, असे कृत्य केल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर (Shiv Sena MLA Santosh Bangar ) यांच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

मंगळवारी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना आमदार संतोष बांगर हे दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास आपल्या १० ते १५ कार्यकर्त्यांसह नागनाथ कनिष्ठ महाविद्यालयातील खोली क्र. ५ मध्ये मतदान केंद्रावर गेले. तेथे त्यांच्यासमवेत अंगरक्षकही होते. स्वत:च्या गळ्यात भगवा रुमाल टाकून मतदानावर प्रभाव पडेल, अशा पद्धतीने त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला. यावरून मतदान केंद्राध्यक्ष तथा आमदरी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दयानंद संभाजी कल्याणकर यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

औंढ्यातील मतदानप्रक्रिया रद्द कराया घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे सांगून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच औंढा येथील प्रभाग क्रमांक पाचमधील मतदान केंद्रावर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील प्रक्रिया रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे मुंबईत करणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षकांकडे तोंडी तक्रार केल्याचे सांगितले, तर औंढ्यात इतर ठिकाणीही त्यांनी बुथवर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकिवात असून, सर्वच प्रक्रिया रद्द करण्याची मागणीही करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाHingoliहिंगोलीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCrime Newsगुन्हेगारी