शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

CoronaVirus In Hingoli : हिंगोलीत रविवारपर्यंत सर्व दुकाने बंद; कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 1:15 PM

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

हिंगोली : हिंगोलीत कोरोनाचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळुन आल्याने खबदारी म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी औषधी सेवा वगळता इतर सर्व दुकाने ३ ते ५ एप्रिल दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश गुरूवारी काढले आहेत. 

कोरोनाचा हिंगोली जिल्ह्यातही शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यापूर्वी किराणा दुकान व भाजीपाला खरेदीसाठी एक दिवस आड मुभा देण्यात आली होती. परंतु आता पुढील तीन दिवस ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान औषध दुकाने वगळता किराणा दुकान व भाजीपाला यासहसर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी या सर्वच वाहनांना रस्त्यावरून फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या बाबातचे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काढले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर जिल्हा प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

याशिवाय वैद्यकीय आपातकाल असल्यास आरोग्य विभागाची अ‍ॅम्ब्युलन्स टोल फ्री १0८, १0२ वर संपर्क करावा किंवा इतर आपातकालीन परिस्थितीमध्ये खाजगी वाहनाने प्रवास करायचा असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष यांचा टोल फ्री क्रमांक १00 वर संपर्क साधावा. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर २४ तास स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षावर संपर्क करून पूर्वपरवानगीनेच प्रवास करता येईल.संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत. यात जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय 0२४५६-२२२५६0, तालुका नियंत्रण कक्ष तहसील हिंगोली 0२४५६-२२२५११, सेनगाव-९८३४९७५२८९, कळमनुरी- 0२४५५-२२00२१, वसमत-९५६११३४३0९, औंढा-९0२८१७४४४३ या क्रमांकांचा वापर करायचा आहे.

सावधान...! वसमतमध्ये सिमाबंदीवसमत शहर व परिसरात सर्व प्रकारच्या हालचाली व्यक्ती, वाहन यास बंदी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढला आहे. त्याचबरोबर वसमत शहराच्या संपूर्ण सीमा बंद करण्याचा आदेश दिला असून यातून कोणतीही वाहने अथवा व्यक्ती आत किंवा बाहेर जाण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित करण्यात आले आहे.यात परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्ते, बाजार, गल्ली, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास शिक्षेस पात्र ठरणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली