शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
3
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
4
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
5
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
6
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
7
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
8
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
9
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
10
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
11
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
12
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
13
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
14
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
15
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
16
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
17
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
18
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
19
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
20
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

हिंगोली : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक सत्र १४ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र याही ...

हिंगोली : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक सत्र १४ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र याही वर्षी कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील, हे सांगणे कठीण आहे. सध्याची स्थिती पाहता कोरोना लसीकरणानंतरच शाळा सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

मागील वर्षभरापासून प्राथमिक शाळा बंदच आहेत. मोजकेच दिवस माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे वर्ग भरले होते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणावरच भर दिला होता. अखेरीस आरटीई अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. २ मे ते १३ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे. त्यामुळे १४ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होईल. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी शासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाला आळा बसेल, असा विश्वास शासनाला आहे. विद्यार्थ्यांचेही लसीकरण झाल्यास शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, त्या वेळची कोरोना संसर्ग व लसीकरणाची स्थिती पाहूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मत शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

२२ हजार विद्यार्थी थेट दुसरीत

- कोरोनामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच आरटीई अंतर्गत उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- जिल्ह्यातील २२ हजार ८५२ विद्यार्थी पहिलीत शिक्षण घेत होते. हे सर्व विद्यार्थी आता थेट दुसरीत गेले आहेत.

- शाळा सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाला आखावे लागणार आहे.

- हे विद्यार्थी थेट दुसरीत गेले असले तरी एकही दिवस शाळेत गेले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी दुसरीत गेले तरी शाळेत पहिल्यांदाच जाणार आहेत.

शिक्षण तज्ज्ञ म्हणतात...

सध्या लहान मुलांना कोरोना होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. कोरोना संसर्गाची अशीच स्थिती राहिल्यास शाळा सुरू करताना सर्वच बाजूंनी विचार करावा लागणार आहे. त्या वेळची कोरोना स्थिती पाहूनच शिक्षण विभाग निर्णय घेईल, असेही शिक्षण तज्ज्ञ सांगत आहेत.

विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक!

विद्यार्थी प्रतिक्रिया...

मागील वर्षी काही दिवसच शाळेत जाता आले. ऑनलाइन अभ्यास घेतला जात होता. मात्र वर्गात शिक्षकांनी शिकविलेले जास्त लक्षात राहते. त्यामुळे शाळा लवकर सुरू कराव्यात.

- ऋतुराज वाढवे, विद्यार्थी

या वर्षी शाळा सुरू झाल्यास पाल्याला शाळेत नक्कीच पाठविणार. वर्षभरापासून मुले घरीच आहेत. त्यामुळे घरात राहून ती कंटाळली आहेत. मुले एकलकोंडी होण्याचीही भीती वाटत आहे.

- रवी गंगावणे, पालक

शाळा तर सुरू व्हायलाच हव्यात. मात्र कोरोना लसीकरण मोहिमेवरही बरेच काही अवलंबून आहे. सध्या तरी जुनी पुस्तके परत घेणे, टी.सी. तयार करणे आदी कामे सुरू आहेत.

- संतोष खंदारे, प्राथमिक शिक्षक