शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : एसपी साहेब... मदत मागता मागता माझा जीव जात आहे! अखेर त्या कोरोनाबाधित पोलिसाचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 14:44 IST

corona virus : पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना उद्देशून मदत मागणारी ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. 

ठळक मुद्दे मला श्वसनाचा खूप त्रास होत असून माझे वडील देखील रूग्णालयात भरती आहेत. साहेब, मी रूग्णालयाच्या टेरेसवरून माझा जीव देत आहे." अशी ऑडीओ क्लीप व्हायरल 

हिंगोली : कोरोना उपचारासाठी छतावरून उडी मारून जीव देण्याची धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर २९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस अधीक्षकांना उद्देशून असलेली त्यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

सचिन पांडूरंग इंगोले (वय 35 रा. गणेशपूर ता.जि. वाशीम) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सचिन इंगोले यांची तब्येत बरोबर नसल्याने त्यांनी कोरोना तपासणी केली होती. यात ते पॉझिटीव्ह निघाल्याने त्यांना २५ एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे योग्य उपचार मिळत नसल्याने तब्येत खालावत चालली होती. त्यांच्या आई-वडीलांवरही उपचार सुरू होते. 

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना उद्देशून मदत मागणारी ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. "एसपी साहेब... पोलीस दल व रूग्णालय प्रशासनाला मदत मागता मागता माझा जीव जात आहे. माझ्यावर योग्य उपचार होत नाहीत. मी अनेकांना संपर्क केला. माझ्याकडे एक रूपया देखील नाही. तुम्ही सर्वजण फक्त येतो म्हणत आहात. मात्र कुणीही येत नाही. मला श्वसनाचा खूप त्रास होत असून माझे वडील देखील रूग्णालयात भरती आहेत. साहेब, मी रूग्णालयाच्या टेरेसवरून माझा जीव देत आहे." अशी ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंतर पोलीस व आरोग्य प्रशासन खडबडून जागे होत उपचारासाठी सरसावले होते. मात्र २९ एप्रिल रोजी  सकाळच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सचिन इंगोले हे २०१८ पासून गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीPoliceपोलिस