शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

Corona Virus : कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी; सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या ४९ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 16:36 IST

Corona Virus: रुग्णालय परिसर तसेच वार्डामध्ये आढळून येणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठळक मुद्दे २४ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी अचानक जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या पाहणीत कोविड वार्ड व परिसरात रुग्णांचे ४९ नातेवाईक आढळून आले.

हिंगोली : येथील जिल्हा रूग्णालयात थांबून सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या रूग्णांच्या ४९ नातेवाईकांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात २४ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. वारंवार सांगूनही नातेवाईक ऐकत नसल्याने अशा नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते.

हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये व रुग्णालयाच्या परिसरात आढळून आलेल्या ३५ पेक्षा अधिक नातेवाईकांना यापूर्वी लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. मात्र काही दिवसांपूर्वी एका रुग्णाच्या नातेवाईकाने विलगीकरणाच्या भीतीने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारली होती. या घटनेनंतर रुग्णालय परिसर तसेच वार्डामध्ये आढळून येणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले. दरम्यान, २४ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी अचानक जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या पाहणीत कोविड वार्ड व परिसरात रुग्णांचे ४९ नातेवाईक आढळून आले.

याप्रकरणी ग्रामसेवक सुभाष बागुल यांच्या तक्रारीवरून संतोष अवचार, सतीष सिद्धार्थ उघडे, रूषीकेश दिलीप अवचार, नामदेव अंजुना आलाटे, विलास सहादू खिल्लारे, सतीष रघुनाथ बुद्रूक, देवानंद बंडू घनघाव, सटवा गंगाराम करजतकर, विश्वनाथ दादाराव हाक्के, हनुमंत दादाराव हाके, शिवाजी विठ्ठल धानवे, बळीराम सुभाष काचगुंडे, दिलीप अर्जूनसिंह भारतद्वाज, संगमेश्वर शंकरअप्पा स्वामी, बबन नाथा वाकळे, शिवाजी महादू इंगळे, कृष्णा डिगांबर ढाकरे, संजय हरीभाऊ आडे, आबासाहेब तुकारामजी मुरकूटे, राजेश भाऊराव शिंदे, सारंगधर यशवंता टाले, रविंद्र भालेराव जाधव, योगेश रामभाऊ राठोड, धोंडबाराव कोंडबाराव खटाव, बबन किशन रिठ्ठे, गजानन घनश्याम रिठ्ठे, संजय मोकिदा कांबळे, मारोती विठ्ठल धनवे, मिलींद माधव धुळे, निखील माधव धुळे, शेख जावेद शेख कासम, शिवशरण टोमाजी फाटमोडे, ज्ञानेश्वर बाजीराव रहाटे, देविदास मोहन कुटे, अमोल भीमराव कांबळे, अन्नपूर्णा बांगर, अल्का अशोक काशिदे, भारती हरिभाऊ केसकर, दुर्गाबाई लक्ष्मणराव शिंदे, कान्होपात्रा धुरपत टाले, राधाबाई सुरेश पुंडगे, गोदावरी आश्रोबा कदम, सुजाता मारोती राऊत, निलावती काशिराम माने, शिलाबाई आनंदा खंदारे, सिंधूबाई विजय जाधव, ज्योती लक्ष्मण शेळके, सुदर्शन शेवलेकर, पंचफुला देवराव अवचार यांच्याविरूद्ध कलम १८८ भादवी व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ब प्रमाणे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीcorona virusकोरोना वायरस बातम्या