जिल्हाभरात आरोग्य विभागाच्या वतीने वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ परिसरातील ३४ जणांची रॅपिड ॲंटिजन टेस्ट केली असता यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही, मात्र हिंगोली व औंढा परिसरातील संशयिताची तपासणी केली असता हिंगोली परिसरात १ तर औंढा परिसरात ३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तसेच यावेळी हिंगोली येथील सामान्य रुग्णालयातील २, कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर ४, लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमधील ४ असे एकूण १० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनाचे ३ हजार ७५० रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ३ हजार ६३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ५६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील २ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचे नव्याने चार रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST