शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा स्फोट; तब्बल ५८ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 8:00 PM

हिंगोली शहरातच रुग्णसंख्या वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ८ जणांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. आजपर्यंतची रुग्णसंख्या आता ७९६ वर पोहोचली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा स्फोट झाला असून गुरूवारी एकाच दिवशी तब्बल ५८ रुग्ण आढळून आले आहेत. मागील तीन दिवसांत रुग्णांचे कमी झालेले प्रमाण पुन्हा वाढले आहे. हिंगोली शहरातच रुग्णसंख्या वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.

आज नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये महसूल कॉलनी १, पलटन ३, साईनगर कळमनुरी २ असे सहा रुग्ण अँटीजन टेस्ट केल्यानंतर समोर आले आहेत. यामध्ये एकजण जिल्हाधिकाऱ्यांचा चालक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर थ्रोट स्वॅब घेतलेल्या ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सरस्वतीनगर १, पेन्शनपुरा १, रिसाला बाजार २, जि.प. क्वाटर्स १, देवगल्ली १, सन्मती कॉलनी ३, गाडीपुरा ९, न.प. कॉलनी ३, महादेववाडी १, वंजारवाडा ३, तोफखाना २ असे हिंगोलीत आढळलेले रुग्ण आहेत. हिंगोली तालुक्यातील बोरीशिकारी १, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ४, गोंदनखेडा १, वसमत येथील ६, वसमत तालुक्यातील वापटी १, पं.स. वसमत १, जुमा पेठ वसमत १, चिखली १, कळंबा १, सती पांगरा १, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा २, विद्यानगर १, भीमनगर ३, बीएसएनएल टॉवरजवळ १ असे ५२ आढळून आले आहेत.

आज घरी सोडलेल्यांमध्ये हिंगोलीच्या आयसोलेशन वार्डातील विठ्ठल कॉलनीचा १ व वंजारवाडा १, कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथून मंगळवारा भागातील तिघांना घरी सोडले आहे. आजपर्यंतची रुग्णसंख्या आता ७९६ वर पोहोचली आहे. यापैकी ५५५ जण बरे झाले आहेत. तर सध्या विविध कोरोना केअर सेंटरमध्ये २३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८ जणांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. 

१२ जणांची प्रकृती गंभीरहिंगोलीच्या आयसोलेशन वार्डातील सात जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर आणखी पाच जणांची स्थिती त्याहीपेक्षा नाजूक असल्याने त्यांना बायपॅप मशिनवर ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत या रुग्णांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. या रुग्णांपैकी काहींच्या प्रकृतीत थोडीबहुत सुधारणा आता दिसू लागली आहे. मागील काही दिवसांत प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत होते. मात्र सध्या त्याला ब्रेक लागला असून हे १२ रुग्णच प्रकृती गंभीर असल्याने आॅक्सिजनवर आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली