कोरोनाने एकाचा मृत्यू; ३६ नवे रुग्ण; २० बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:08+5:302021-03-04T04:57:08+5:30

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात नर्सी नामदेव १, पोस्ट ऑफिसजवळ १, नारायणनगर १, बियाणीनगर १, छत्रपतीनगर १, मारवाडी गल्ली १, ...

Corona dies one; 36 new patients; 20 good | कोरोनाने एकाचा मृत्यू; ३६ नवे रुग्ण; २० बरे

कोरोनाने एकाचा मृत्यू; ३६ नवे रुग्ण; २० बरे

googlenewsNext

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात नर्सी नामदेव १, पोस्ट ऑफिसजवळ १, नारायणनगर १, बियाणीनगर १, छत्रपतीनगर १, मारवाडी गल्ली १, कमलानगर २, नाईकनगर २, रामाकृष्णानगर १, सरस्वतीनगर २, नवीन मोंढा १, भोईपुरा १ असे १६ बाधित आढळले. औंढा परिसरात जवळाबाजार २, सिरला १ असे तिघे बाधित आढळले. वसमत परिसरात बालाजीनगर १, आरळ १, वर्ताळा १ असे तिघे बाधित आढळले.

आज बरे झालेल्यांत हिंगोली जिल्हा रुग्णालयातील १८ जणांत जिजामातानगर १, शस्त्रीनगर ५, इंचा २, शाहूनगर १, रिसोड १, बियाणीनगर १, तलाबकट्टा १, बोरीशिकारी १, जगदंब हॉस्पिटल येथे संदर्भित केलेल्या ५ रुग्णांचा समावेश आहे. त्यांना घरी सोडले, तर लिंबाळा केअर सेंटरमधून पिंपळदरी येथील एक, कळमनुरी केअर सेंटरमधून विकासनगर येथील एकास बरे झाल्याने घरी सोडले. हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात वसमत तालुक्यातील आरळ येथील एका ६६ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा आता ६१ वर पोहोचला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२३१ जण बाधित आढळले. त्यापैकी ३८५९ बरे झाल्याने त्यांना घरी सोडले, तर सध्या ३११ जणांवर उपचार सुरू आहेत. दाखल असलेल्यांपैकी एकूण २० जणांची प्रकृती गंभीर असून, यापैकी १८ जण ऑक्सिजनवर असून २ जण बायपॅपवर आहेत.

Web Title: Corona dies one; 36 new patients; 20 good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.