रेशीम किटकावरील उझी माशीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:03+5:302021-03-07T04:27:03+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी रेशीम किटकावरील उझी माशीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करावे, असा सल्ला म्हैसूर येथील ...

Control the Uzi fly on the silkworm in an integrated manner | रेशीम किटकावरील उझी माशीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करा

रेशीम किटकावरील उझी माशीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करा

Next

हिंगोली : जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी रेशीम किटकावरील उझी माशीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करावे, असा सल्ला म्हैसूर येथील सेंद्रिय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने शेतकऱ्यांना दिला आहे.

उझीसाइड, स्टिकीटाय, निसोलायनेक्सचा जैविक उपाय व उझीट्राय या सर्व पर्यायांचा एकत्रित वापर केला तर ८४ टक्क्यांपर्यत उझी माशीचे नियंत्रण करता येते. सर्व खिडक्या, दरवाजांना नायलॉनची जाळी लावणे आवश्यक आहे. दरवाजे अपोआप बंद होण्याची व्यवस्थाही करून घ्यावी. तसेच नायलॉन वायर व्यवस्थित गुंडाळून ठेवावे. तसेच संगोपन गृहप्रवेशद्वाराबाहेर नायलॉन वायरचा वापर करून अँटिचेंबर तयार करून घेणे आवश्यक आहे. शेतातून तुतीचा पाला आणल्यानंतर सरळ संगोपन गृहात न आणता एक किंवा दोन तास अँटिचेंबरमध्ये ठेवावा. या प्रकारामुळे उझी माशी बाहेरच्या बाजूस उडून निघून जाईल. अधिक माहितीसाठी कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधावा, असेही आवाहन रेशीम संशोधन विभागाने केले आहे.

Web Title: Control the Uzi fly on the silkworm in an integrated manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.