डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:45+5:302021-06-02T04:22:45+5:30

सध्या जे लसीकरणाचे ठोकताळे मांडले जात आहेत, त्यानुसार १८ वर्षांच्या पुढील वयोगटाचा विचार केला तरीही दहा लाख लोकसंख्येला लस ...

Complete vaccination by December is difficult; Got it even though it was done by the end of 2022! | डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळविले!

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळविले!

Next

सध्या जे लसीकरणाचे ठोकताळे मांडले जात आहेत, त्यानुसार १८ वर्षांच्या पुढील वयोगटाचा विचार केला तरीही दहा लाख लोकसंख्येला लस द्यावी लागणार आहे. यापैकी ४० हजार जणांनाच दोन्ही डोस दिले असून, एक लाखजणांनी एक डोस घेतलेला आहे. आताचा वेग पाहिला, तर जानेवारीपासून मेपर्यंत पाच महिन्यांत चार टक्केच लोकांना दोन्ही डोस दिले; तर एक डोस दहा टक्के लोकांना दिला. आरोग्य विभागाला लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली तर एका महिन्यात सगळे लसीकरण करणेही शक्य आहे. मात्र लसींचे उत्पादन त्या तुलनेत होणार नसेल, तर अशी मोहीम आखायची तरी कशी? हा प्रश्न आहे. त्यातच केंद्र व राज्य शासनातच लस खरेदीवरून सुरू असलेला तिढा मिटला नाही. शिवाय देशातील कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेचेही वृत्त येत असल्याने डिसेंबरपर्यंत लसीकरण होईल, हे दिवास्वप्नच वाटत आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ९ लाख व दुसऱ्या टप्प्यात १० लाख डोस उपलब्ध करून द्यावे लागतील. आतापर्यंत एक लाख डोस एकदाही कधी मिळालेले नाहीत.

१८ पेक्षा कमी वयाचे काय?

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर लसीकरणाचे प्रयोग आपल्या देशात तरी अजून नाहीत. विदेशात असे काही प्रयोग झाले आहेत. मात्र या लसींची उपलब्धता आपल्याकडे कधी होईल, हा प्रश्न आहे.

सध्या तरी केंद्र अथवा राज्य शासनाकडून सर्वांत जास्त धोका असलेल्या गंभीर आजाराच्या ४५ वर्षांवरील लोकांसह ज्येष्ठांकडे लक्ष आहे. हिंगोली जिल्ह्यात अशा लोकांची संख्याही ४ लाख आहे.

जोपर्यंत शासन स्तरावरून सूचना येत नाहीत, तोपर्यंत १८ ते ४५ वयोगटाचेच लसीकरण बंद आहे. त्यामुळे यापेक्षा कमी वयाचा विचार कधी होणार आहे, याबद्दल निश्चितपणे कोणीच सांगू शकत नाही.

लसीकरणाचे केंद्र तेवढेच, साठाच मिळेना

लसीकरणाचे केंद्र ३९ असून, त्यात वाढ होताना दिसत नाही. कधी केंद्र वाढवायचा विचार केला, तर लसींचा वाढीव साठा येणे अपेक्षित आहे. शिवाय आता पहिल्यासारखी लसीकरणासाठी गर्दी होत नाही. ग्रामीण भागात तर नागरिकांना विनंती करून बोलवावे लागत आहे. जागरुक नागरिक तेवढे लस घेत आहेत.

लसींचा साठा जसा मिळेल, त्याप्रमाणे आम्ही नियोजन करून लस देत आहोत. शासनाने सूचना व लसींचा साठा दिला, तर इबोलाच्या लसीकरणाप्रमाणे काही दिवसांतच लसीकरण पूर्ण करणे शक्य आहे.

डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, लसीकरण समन्वयक

Web Title: Complete vaccination by December is difficult; Got it even though it was done by the end of 2022!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.