शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

महावितरणच्या ढिसाळ कारभाराला नागरिक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:03 IST

शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्यांना नागरिक वैतागून गेले आहेत. शहरातील रात्री-अपरात्री वीज बंद होते. दिवसाही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. वीज समस्यांकडे मात्र महावितरणचे दुर्लक्ष आहे. दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष भेटून वीज समस्येबाबत विचारणा केली असता केवळ बिल भरणा केला आहे का? असा प्रश्न केला जात असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्यांना नागरिक वैतागून गेले आहेत. शहरातील रात्री-अपरात्री वीज बंद होते. दिवसाही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. वीज समस्यांकडे मात्र महावितरणचे दुर्लक्ष आहे. दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष भेटून वीज समस्येबाबत विचारणा केली असता केवळ बिल भरणा केला आहे का? असा प्रश्न केला जात असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.महावितरणकडून वीज ग्राहकांना सुरळीत वीज सेवा पुरविणे आवश्यक आहे. रोहित्रात बिघाड किंवा वीज उपकरणांचे तांत्रिक कामे सुरू असल्याचे सांगत दिवसभर मध्येच वीजपुरवठा खंडित केला जातो. नेहमीच्या या त्रासाला मात्र आता नागरिक पूर्णत: वैतागून गेले आहेत.दिवाळीच्या ऐन सणासुदीतही वीजेचा प्रश्न४ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. किमान दिवाळी सणानिमित्त तरी महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठ्याची अपेक्षा आहे. शहरातील वीज तारांचा गुंत्यामुळेही वीजसेवा वारंवार खंडित होते, असे प्रकाश सोनी यांनी सांगितले.४विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना भारनियमन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने भारनियमन बंद करावे. विशेष म्हणजे ऐन सणासुदीच्या काळामध्ये भारनियमन सुरू असल्यामुळे सरकारची खरी प्रतिमा उघड झाली आहे. अशी प्रतिक्रीया राकाँचे शहराध्यक्ष जावेद राज यांनी दिली.४शहरातील अनेक रोहित्रांत नेहमीच बिघाड होतो. त्यामुळे लाईट अचानक बंद होते. हा प्रकार आता मागील काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे निकामी झालेल्या रोहित्रांची कायमस्वरूपी दुरूस्ती होणे गरजेचे आहे. जेणेकरून वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करता येईल. वीज समस्येकडे संबधित अधिकाºयांनी लक्ष द्यावे.वीज समस्यांबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया४वारंवार होणाºया वीजपुरवठा खंडितमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना सांगितल्यास लक्षही दिले जात नाही. त्यामुळे हिंगोली शहरातील वीज समस्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी गणेश पंडित यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.४महावितरणकडून वीज बिल भरणा करण्यास सांगितला जातो. वीज बिल भरूनही ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मात्र केला जात नाही. दिवसातून वीज जाण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावर महातिवरणने काही तोडगा काढावा व सुरळीत वीजपुरवठा ग्राहकांना करण्यात यावा, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. अशोक डुब्बेवार यांनी दिली.४हिंगोली शहरातील वीजपुरवठा विस्कळीत होणे हा काही नवा प्रकार नाही. तांत्रिक अडचणी असल्या तरी त्या वेळेत दुरूस्त करायला हव्यात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याकडे संबंधित अधिकाºयांनी लक्ष द्यायला हवे. तसेच अखंडित वीजपुरवठ्याची सेवा वीज ग्राहकांना महावितरणने द्यायला हवी अशी मागणी एएसआय संदीप राठोड यांनी केली.प्रतिसाद नाही...महावितरण कार्यालयातील मुख्य अधिकाºयांकडे वीज ग्राहकांचे प्रश्न पोहोचत नाहीत. त्यामुळे वीज समस्येचा प्रश्न कायम राहतो. हिंगोली तालुक्यातील वीजेचा प्रश्न तर मागील दोन महिन्यांपासून गंभीर बनला आहे. कालचेच उदाहरण द्यायचे झाल्यास रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक लाईट गेली होती. वीज ग्राहकांनी याबाबत संबंधित अधिकाºयास वारंवार फोनही लावले. परंतु प्रतिसादच मिळाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना त्रास सहन करावा लागला. वरिष्ठ अधिकाºयांनी ग्राहकांच्या वीज समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणHingoliहिंगोली