शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चुलीवरच शिजते बिरबलाची खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:33 IST

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शाळेतून दिला जाणार शालेय पोषण आहार अजूनही चुलीवरच शिजत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ८८२ पैकी केवळ १० शाळांमध्येच कीचनशेड उपलब्ध नाही. असे असले तरी केवळ २० ठिकाणी गॅस सुविधा उपलब्ध आहे, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शाळेतून दिला जाणार शालेय पोषण आहार अजूनही चुलीवरच शिजत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ८८२ पैकी केवळ १० शाळांमध्येच कीचनशेड उपलब्ध नाही. असे असले तरी केवळ २० ठिकाणी गॅस सुविधा उपलब्ध आहे, हे विशेष.सरपणासाठी होणारी वृक्षतोड थांबावी यासाठी शासनाकडून विविध योजनेअंतर्गत गॅस उपलब्ध करून दिला जात आहे. परंतु राज्यभरातील शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार चुलीवरच शिजविला जातो. चुलीवर स्वयंपाक केल्याने धुरामुळे फुफ्फुसाचे आजार जडतात. त्यामुळे शासनाकडून धुरापासून महिलांना मुक्त करण्यासाठी गॅस वाटप केले जात आहेत. तर दुसरीकडे पोषण आहाराची खिचडी चुलीवरच शिजविली जात असून इंधनाचा खर्चही संबधित शाळांना दिला जातो. शाळेच्या प्रांगणात चुलीवर खिचडी शिजविली जात असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांनाही धुराचा त्रास सहन करावा लागतो. परिणामी विद्यार्थी व स्वयंपाकी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील ८८२ शाळांतून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. आहार शिजविण्यासाठी शाळेच्या ठिकाणी कीचनशेडही उपलब्ध आहेत. केवळ दहा ठिकाणी कीचनशेड उपलब्ध नाहीत. वसमत येथील २ शाळांत तर कळमनुरी येथील ५ शाळेत तसेच औंढा नागनाथ २ व सेनगाव येथील एका शाळेत कीचनशेड उपलब्ध नाही. मात्र कीचनशेडमध्ये हवी तशी आवश्यक सुविधा नाहीत. अनेक किचनशेड जीर्णावस्थेत आहेत. काही ठिकाणी पाणी उपलब्ध नसते. या कारणांमुळे स्वयंपाक करणाऱ्या महिलांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागतेशालेय पोषण आहार योजने अंतर्गत शिक्षण खात्याच्या संबधित विभागाकडे कोणतीच आकडेवारी उपलब्ध नसते. वरिष्ठ अधिकाºयांनी एखाद्या कामी जर आकडेवारी मागितल्यास ऐनवेळी कर्मचारी धावपळ करतात. वेळोवेळी सूचना देऊनही संबधित विभाग मात्र वरिष्ठांच्या सूचनेकडे लक्ष देण्यास तयार नाही, हे विशेष. शिक्षणाधिकारी कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे डायटचे प्राचार्य गणेश शिंदे यांच्याकडे सध्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला आहे.जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेची प्रभाविपणे अंलबजावणी होताना दिसून येत नाही. शिवाय संबंधित गावातील पालकांच्या तशा तक्रारीही आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा