कोरोनामुळे वर्षभरापासून लहान मुलांना घरातच थांबावे लागत आहे. पालकही खबरदारी घेत असून लहान मुलांना घरातच थांबण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दिवसभर घरातच थांबावे लागत असल्याने मुले मोबाईल, टी
व्ही. व्हीडीओ गेमयामध्ये रमत आहेत. जेवनानंतर लगेच झोपण्याचे प्रकार वाढल्यामुळे लहान मुलांचे वजन वाढण्यास सुरवात झाली आहे. याशिवाय दिवसभर घरीच असल्याने जंक फुड, तळलेले पदार्थ खाण्यावर भर राहत आहे. यामुळे मुलांचे वजन वाढत असल्याने पालकांसमोर नवी चिंता उभी टाकली आहे. मुलांचे वजन कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करीत असल्याचे दिसून येत आहे.
मुलांनी हे करावे
दिवसभर घरातच थांबावे लागत असल्याने घरातील लहान सहान कामे करण्यास मदत करणे, घरातील जागेनुसार खेळ खेळावेत, जेवनानंतर काही वेळ शत पावली करावी, जेवनानंतर किमान २ ते ३ तासांनी झोपावे, घरी बनविलेले अन्न घ्यावे, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे.
मुलांनी हे टाळावे
बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, मोबाईल, टी.व्ही. जास्त वेळ पाहू नये, आईसक्रीम खाणे टाळावे, चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे, टी.व्ही. पाहताना जेवन करणे टाळावे, यामुळे आपण किती जेवन करत आहोत, हे समजत नाही. त्यामुळे टी.व्ही. बंद करूनच लहान मुलांना जेवन द्यावे, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे.
घरातल्या घरात राहून मुले मोबाईल, टी.व्ही. पाहण्यात दंग राहत आहेत. त्यामुळे शारिरीक हालचाली मंदावत आहेत. परिणामी वजन वाढत आहे. यासाठी सायकलिंग करावी, मुलांनी वयामानानुसार इंनडोअर खेळ खेळावेत. -डॉ.विनोद बीडकर, बालरोग तज्ज्ञ
कोरोनामुळे मुलांना आपण घराबाहेर जावू देत नाहीत. त्यामुळे मोबाईल, टी.व्ही. पाहण्यात व्यस्त राहत आहेत. एकाच जागेवर बसून राहत असल्याने मुलांचे वजन वाढत आहे. यासाठी घरातील लहान सहान कामे करण्यासाठी मुलांना प्रेरीत करावे, इंनडोअर खेळ खेळावेत. जंकफुडचा वापर टाळावा.
-डाॅ. गोपाल कदम, बालरोग तजज्ञ
कोरोनामुळे मुले घरात राहत आहेत. तसेच टी.व्ही. पाहत जेवन करीत असल्याने किती खात आहेत, याचे भान राहत नाही. परिणामी वजन वाढण्याची शक्यता असते. तसेच तळलेले पदार्थ देणे टाळावे, जेवनानंतर शतपावली करावयास सांगावे, इनडोअर खेळ खेळावेत.
- डॉ. दीपक मोरे. बालरोग तज्ज्ञ