शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चेक दिला पण खात्यात पैेसे कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:14 IST

जिल्हा परिषदेमार्फत गतवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईत जलस्त्रोत अधिग्रहित केलेल्या शेतकºयांना मोबदला देण्यासाठी दिलेला धनादेश खात्यात रक्कम नसल्याने तसाच पडून आहे. शेतकरी मात्र बँकेचे खेटे घालत असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजि.प. : मोबदल्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेमार्फत गतवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईत जलस्त्रोत अधिग्रहित केलेल्या शेतकºयांना मोबदला देण्यासाठी दिलेला धनादेश खात्यात रक्कम नसल्याने तसाच पडून आहे. शेतकरी मात्र बँकेचे खेटे घालत असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेच्या वतीने अधिग्रहण करताना संबंधित शेतकºयांना त्या-त्या महिन्यात त्याचा मोबदला दिला जात नाही. टंचाईचा काळ संपल्यानंतर एकत्रित देयके सादर करण्यात येतात. मात्र त्यातही काही पंचायत समित्यांची दप्तर दिरंगाई सुरू असते. त्यामुळे शेतकºयांनी कधीच वेळेत ही रक्कम मिळत नाही. गेल्यावर्षीची रक्कम मिळाली नसल्यान जि.प.च्या मागील काही सभांमध्ये हा मुद्दा गाजला. त्यानंतर जि.प.च्या पाणीपुरवठा व अर्थ विभागाने ही रक्कम अदा करण्यात येईल, असे सांगितले होते. त्याचा परिणाम म्हणून दुसºया वर्षीचा म्हणजे यंदाचा टंचाईचा काळ सुरू झाल्यानंतर जि.प.ने जवळपास ६0 ते ७0 शेतकºयांची खाते क्रमांकासह यादी व ५८ लाखांचा धनादेश स्टेट बँक आॅफ इंडियाकडे पाठविला. २३ एप्रिलला ही कार्यवाही करण्यात आली होती. सदर शेतकºयांनाही याबाबतची माहिती दिली जात होती. त्यामुळे शेतकरी मध्यंतरीच्या सुट्यांनंतर दररोज बँकेचे खेटे घालत आहेत. मात्र रक्कमच जमा झाली नसल्याचे त्यांना सांगितले जात होते.शेतकरी : पंचायत समित्यांची दफ्तरदिरंगाईकाहींनी स्टेट बँक आॅफ इंडियात चौकशी केल्यावर अजून खात्यात रक्कमच टाकली नसल्याचे सांगण्यात येत होते. जेव्हा शेतकºयांनी दबाव आणला तेव्हा ७ मे रोजी ही रक्कम वर्ग करू, असे सांगण्यात आले होते. तरीही न झाल्याने मंगळवारी पुन्हाशेतकरी बँकेत गेले तर जि.प.ने ज्या खात्याचा धनादेश दिला, त्यातच रक्कम नसल्याचे समजले. त्यामुळे टंचाईच्या काळात मदत करणाºया शेतकºयांची चेष्टा चालविली की काय? असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :MONEYपैसाHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद