शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चेक बाऊन्स; दंडाच्या रकमेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:40 IST

वेळ मारुन नेण्यासाठी धनादेशाचा वापर करणे वीजग्राहकांना आता परवडणार नाही. कारण वीजबिलापोटी दिलेला धनादेश (चेक) बाऊन्स झाल्यास संबधितास ५९० रुपयांचा दंड बसणार आहे. शिवाय पुढील सहा महिने धनादेश स्विकारला जाणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वेळ मारुन नेण्यासाठी धनादेशाचा वापर करणे वीजग्राहकांना आता परवडणार नाही. कारण वीजबिलापोटी दिलेला धनादेश (चेक) बाऊन्स झाल्यास संबधितास ५९० रुपयांचा दंड बसणार आहे. शिवाय पुढील सहा महिने धनादेश स्विकारला जाणार नाही. तसेच पुनर्रजोडणी आकारतही वाढ झाली आहे. मात्र आॅनलाईन वीजबिलांचा भरणा वाढण्यासाठी १ सप्टेंबरपासून पाव (०.२५ %) टक्याची सूट दिली जात आहे.दरमहा येणारे वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. राज्यातील केवळ १४ टक्के ग्राहक आॅनलाईनद्वारे वीजबिल भरतात. तर उर्वरित वीजबिल भरणा केंद्रावर रांगेत उभे राहून रोखीने किंवा धनादेशाने वीजबिल भरतात. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात महसूलात आर्थिक शिस्त येण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. चेक बाऊन्ससाठी पूर्वी ३५० रुपये असलेला दंड आता ५०० रुपये केला आहे. त्यावर १८ टक्के जीएसटी असे मिळून ५९० रुपये भुर्दंड चेक बाऊन्स झालेल्या वीजग्राहकांना बसणार आहे. तसेच पुढील सहा महिने त्यांचा धनादेश स्विकारला जाणार नाही. तर वारंवार कल्पना देऊनही वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जातो. हा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नवीन आदेशानुसार सिंगल फेजला १०० रुपये व थ्री फेजला २०० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.ग्राहकांना विजेच्या सर्व सेवा मोबाईल अ‍ॅपवर व महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. राज्यातील ३२ लाखांहून अधिक ग्राहक मोबाईल अ‍ॅपचा वापर करत आहेत. नांदेड परिमंडलातील ग्राहकांनीही आॅनलाईन सेवांचा वापर वाढवला आहे. माहे एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ९४ कोटी ४५ लाख रूपयांचा वीजबील भरणा आॅनलाईन स्वरूपात केला आहे.यामध्ये ५८ कोटी ७१ लाख रूपयांचा सर्वाधिक भरणा नांदेड जिल्हयातील वीजग्राहकांनी केला. तर परभणी जिल्हयातील ग्राहकांनी १९ कोटी ३४ लाख तसेच हिंगोली जिल्हयातील ग्राहकांनी १४ कोटी ४ लाख रूपयांचा भरणा केला आहे. वेळ, श्रम व पैसा वाचवणारा आॅनलाईन पर्याय जास्तीत जास्त वीजग्राहकांनी स्विकारुन आपले वीजबिल वेळेत भरावे व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांनी चालू वीजबिलासह सर्व थकबाकी याच महिन्यात वसूल करण्यासाठी महावितरणने मोहीम आखली आहे. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीसह चालू वीजबिलाचा भरणा करावा असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रmahavitaranमहावितरण