शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:15 IST

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी शासनाकडून खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभाग : शासनाकडून निधीस मंजुरी

हिंगोली : राज्यातील टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी शासनाकडून खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहिर केला असून टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.दहावी बारावतील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची यादीनुसार तेथील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले जाणार आहेत. शासनाकडून याबाबत शिक्षण विभागास तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत राज्यमंडळाकडे एकूण ८ कोटीं ३२ लाख ६८ हजार ९०५ एवढा निधी शिल्लक आहे. या शिल्लक निधीतून राज्यमंडळाने सन २०१७-१८ व २०१८-१९ मधील महसूल व वन विभागाने घोषीत केलेल्या राज्यभरातील टंचाईग्रस्त भागातील दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय त्यानंतरही तरतूद कमी पडल्यास सन २०१८-१९ या वर्षाकरीता ३८०७.३ हजार उपलब्ध तरतूदीमधून शुल्क माफी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. परंतु सदर प्रक्रियेस जिल्ह्यात अद्याप सुरूवात करण्यात आली नाही. टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची आकडेवारी जुळवणीचे कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्येक्षात मात्र कामास अद्याप सुरूवातच झालेली नाही.एका महिन्यात कार्यवाही कराशालेय शिक्षण क्रिडा विभागाच्या १८ आॅक्टोबर १९९३ च्या शासननिर्णयानुसार टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दुष्काळ जाहिर केलेल्या टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहेत. सदर प्रक्रीया एका महिन्यात पुर्ण करावी अशाही शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातर्फे नियोजन सुरू असल्याचे सांग्ण्यात आले. शिवाय टंचाईग्रस्त गावांच्या संख्येनुसार तेथीलविद्यार्थ्यांना लाभ दिला जाईल.

टॅग्स :HingoliहिंगोलीStudentविद्यार्थीEducationशिक्षण