लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : शिवारात एका आखाड्यावर जवळपास ५० किलो चंदनाचा साठा शुक्रवारी दुपारी कुरूंदा पोलिसांना सापडला असून जवळपास दीड लाख रुपयांचा माल असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी सात जणांवर कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.कुरूंदा येथे चंदन तस्करीने चांगलाच जोर पकडला असून दिवसाढवळ्या चंदनतस्करी होवू लागल्याने चंदन तस्करांची दहशत पसरली होती. चंदन तस्करीला लगाम लागण्यास अपयश निर्माण झाल्याने चंदनाच्या झाडांची चोरी वाढली होती. कुरूंदा शिवारात चंदनाचा साठा असल्याची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्या आखाड्यावर धाड टाकून जवळपास ५० किलो चंदन साठा हस्तगत करण्यात आला. जवळपास दीड लाख रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला.सात जणांविरुद्ध कारवाई...पोना बालाजी जोगदंड यांच्या फीयार्दीवरुन कुरुंदा पोलिस ठाण्यात आरोपी सय्यद समिर , शेख खदीर , दाउद पट्टेदार, जावेद कुरेशी, चांदपाशा कुरेशी, शेख मेहताब , किसन भुस्से यांच्या विरोध्द कलम ३७९,४१३, ३४, ४१,४६, ६१ वन अधिनियम कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार आहेत या प्रकरणा अधिक तपास सपोनि शंकर वाघमोडे सपोउपनि शंकर इंगोले हे करीत आहेत.
कुरूंद्यात आखाड्यावर चंदन साठा सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:21 IST