शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पतंगोत्सव साजरा करा पण....जरा जपून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:46 IST

मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा सण जसा जवळ येऊ लागतो, तसे बालगोपालांसह मोठ्यांनाही वेध लागतात ते पतंग उडविण्याचे रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळच आनंद. मात्र या आनंदाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा सण जसा जवळ येऊ लागतो, तसे बालगोपालांसह मोठ्यांनाही वेध लागतात ते पतंग उडविण्याचे रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळच आनंद. मात्र या आनंदाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते. पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे याप्रसंगी जीवही गमवावा लागतो. त्यामुळेच पतंग उडविताना काही दुर्घटना होणार नाही याची सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षिततेचे नियम पाळूनच पतंग उडवावेत. विशेष म्हणजे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे. पतंग उडविताना अपघात घडल्याच्या घटना बातम्यांच्या स्वरुपात आपण दरवर्षी वाचतो. शहरी भागात अपुऱ्या जागेअभावी घराच्या छतावर पतंग उडविताना अनेकजण दिसतात. अशावेळी अनेकांना घरावरून गेलेल्या वीजतारांचाही विसरही पडतो. खबरदारी न घेतल्यामुळे अपघात होतो. त्यात वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचीही युवकांत जणू स्पर्धाच लागते. अशावेळी शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले. वीजतारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात तारेचे घर्षण होऊन शॉटसर्किटची शक्यता असते. मोकळ्या जागेतच पतंग उडवावेत व पालकांनी दक्ष राहावे. मदतीसाठी जवळील महावितरणच्या कार्यालयाशी किंवा कॉल सेंटरच्या १९१२, १८००-२३३-३४३५ आणि १८००-१०२-३४३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

टॅग्स :SocialसामाजिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम