शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 19:12 IST

साडेपाच लाख रूपये आरटीजीएसद्वारे दुसऱ्या खात्यात जमा करून अपहार

ठळक मुद्देकर्मचाऱ्याने ती रक्कम परस्पर उचलून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

शिरडशहापूर  : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून सेवानिवृत्त शिक्षकाच्या खात्यातील साडेपाच लाख रुपये आरटीजीएसद्वारे परस्पर दुसऱ्या खात्यात टाकून उचलून घेतल्याप्रकरणी बँकेचे कर्मचारी आर.डी.पतंगे यांच्यावर उपहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. 

औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसना येथील सेवानिवृत्त शिक्षक रमेश वसंतराव थोरात यांचे शिरडशहापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते होते. या खात्यात त्यांनी ९ लाख रुपये जमा ठेवले होते. नंतर काही दिवसांनी त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातील साडेपाच लाख रूपये आरटीजीएसद्वारे दुसऱ्या खात्यात जमा करून साडेपाच लाख रुपये १७ जुलै रोजी परस्पर उचलून घेतल्याचे आढळले. यासंदर्भात थोरात यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता संबंधित कर्मचाऱ्याने ती रक्कम परस्पर उचलून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वरिष्ठांनी साडेपाच लाख रुपये रुपये पतंगे यांच्याकडून वसुल करून खातेदाराच्या नावावर ती रक्कम जमा करून टाकली.

बँक कर्मचारी पतंगे यांना तात्काळ निलंबितही करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका इन्स्पेक्टर प्रल्हाद संभाजी भालेराव यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात बँकेचे कर्मचारी आर.डी.पतंगे यांच्याविरूद्ध साडेपाच लाख रुपयांचा अपहार करून खातेदाराची फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४२०, ४०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रकाश नेव्हल, पोकाँ एस.जी.भिसे, बी.जी.म्हात्रे आदी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीfraudधोकेबाजी