शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील सोयाबीनच्या गंजीमुळे कार उलटली; भीषण अपघातात शिक्षक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 15:47 IST

रस्त्याच्या कडेला उभारलेल्या सोयाबीनच्या गंजीला लावलेल्या दगडावरुन गेली आणि उलटली.

ठळक मुद्देअल्पवयीन दोघे जखमी

सेनगाव : सेनगाव -हिगोली मार्गावर तळणी पाटीजवळ भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला उभारलेल्या सोयाबीनच्या गंजीमुळे बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास उलटली. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यात कार चालवणाऱ्या शिक्षकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. तर शिक्षकाचा मुलगा आणि अन्य एकजण जखमी आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, लिंबाराव कुंडलीक कुदंरगे (४३)हे तालुक्यातील कवरदडी येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत. बुधवारी रात्री ते मुलगा ऋषी (१७ ) आणि योगेश अप्पासाहेब कुदंरगे (१७) यांच्यासोबत कारमधून (एमएच.०१ सीडी ६७७९ ) हिगोलीहून सेनगावकडे प्रवास करत होते. रात्री ९ वाजेच्या दरम्यान तळणी पाटीजवळ त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभारलेल्या सोयाबीनच्या गंजीला लावलेल्या दगडावरुन गेली आणि उलटली. वेग जास्त असल्याने लिंबाराव यांचे कारवरील  नियंत्रण सुटले. यामुळे कार दोनतीन वेळेस उलटत रस्त्याच्या बाजूला पडली. 

या भीषण अपघातात कार पूर्णपणे दबली गेल्याने लिंबाराव कुदंरगे हे गंभीर जखमी झाले तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नांदेड येथे नेत असतानाच शिक्षक कुदंरगे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रिसोड -सेनगाव-हिगोली मार्गावर शेतकरी खळे करण्यासाठी सरार्सपणे सोयाबीनच्या गंजी उभारत आहेत. यासाठी वापरलेल्या दगडामुळे अशा प्रकारे भीषण अपघात होत आहेत. यामुळे अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली