पोत्रा : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, पोत्रा याठिकाणी साठवण तलाव मंजूर झाला आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी भूमिहीन होत असल्याने पोत्रा येथील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आ. संतोष बांगर यांना भेटून, नियाेजित साठवण तलाव रद्द करण्याची मागणी केली शेतकऱ्यांनी केली आहे. कळमनुरी तालुक्यातील पोत्रा, सिंदगी येथे येथे आ. संतोष बांगर यांच्या पाठपुराव्यामुळे साठवण तलावासाठी ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यामुळे शेकडो हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहेे. यामध्ये अनेक शेतकरी अल्प, अत्यल्प भूधारक आहेत. याचा विचार करून पाेत्रा येथील शेतकरी शिवाजी मुलगीर, आकाश मुलगीर, सूरज मुलगीर, शंकर मुलगीर, रामराव मुलगीर, वसंतराव मुलगीर, सोपान रणवीर, मनोहर रणवीर, दिलीप मुलगीर, बालाजी पांचाळ, केरबा खिलारे, बालाजी मुलगीर, रामकिशन भुतनर, शिवाजी राऊत शेतकरी शिष्टमंडळाने आ. बांगर यांची भेट घेऊन यासंबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी हा तलाव रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर येथील साठवण तलाव रद्द करणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. तसेच रुदवाडी, बेलाेराे येथील शेतकऱ्यांची साठवण तलावाची मागणी असल्याने तेथील पर्यायी जमिनीवर शेतकऱ्यांच्या सहमतीने साठवण तलावाचे काम करणार असल्याचे सांगितले.
फाेटाे नं. ११