शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा अभियंता भासवून बनावट सोने विक्रीचा धंदा; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

By रमेश वाबळे | Updated: June 5, 2023 16:46 IST

हिंगोलीच्या स्थागुशाची कारवाई,  ३ लाख २५  हजाराचा मुद्देमाल जप्त

हिंगोली : महावितरणचा अभियंता असल्याचे भासवून बनावट सोने विक्री  व गहाण करण्याच्या प्रयत्नातील एका तोतयास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी हिंगोली- कळमनुरी महामार्गावरील एका हाॅटेलसमोरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट ओळखपत्रासह कार असा एकूण ३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वीच तरूणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखों रूपये उकळल्याप्रकरणी  एका तोतया जिल्हाधिकाऱ्यास हिंगोली पोलिसांनी बेड्या घातल्या होत्या.

जिल्ह्यात बनावट सोने विक्री करणारी टोळी वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या टोळीकडून गोल्ड लोन फायनान्समध्येही बनावट सोने गहाण ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे कळाल्यानंतर पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांना सूचना केल्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात पथक नेमण्यात आले. या पथकाने ५ जून रोजी हिंगोली - कळमनुरी महामार्गावरील एका हाॅटेलसमोर कारवाई करीत त्या ठिकाणाहून एम.एच.४६ एडी ५७९४ ही कार व योगेश सुभाष इंगोले (रा.लासीना ता.जि.हिंगोली) यास ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस केली असता साथीदार संतोष देशमुख याच्या सोबत मिळून बनावट सोन्याच्या बांगड्या हिंगोली येथील सराफा दुकानावर विक्री व गोल्ड लोन फायनान्सवर गहान ठेवण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.  पोलिसांनी योगेश इंगोले यास ताबत्यात घेत त्याच्याकडून बनावट ओळखपत्र, कार, मोबाइल असा एकूण ३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. योगेश हा त्याच्या कारवर ‘महाराष्ट्र शासन महावितरण’ असे स्टीकर लावून वावरत होता. तसेच स्वत: महावितरणचा अभियंता असल्याचे भासवित होता.  याप्रकरणी योगेश इंगोले व संतोष देशमुख यांच्या विरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, अंमलदार लिंबाजी वाव्हळे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, हिरभाऊ गुंजकर यांनी केली.

बनावट नोटा प्रकरणातील आरोपी...तोतया अभियंता योगेश इंगोले याच्यासोबत मिळून बनावट सोने विक्री व गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणारा संतोष देशमुख हा यापूर्वीच्या उघड झालेल्या बनावट नोटा प्रकरणातील आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे याप्रकरणाचा  सर्व बाजूने तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता ...आरोपींनी बनावट सोने आणले कुठून आणि आत्तापर्यंत ते सोने किती लोकांना विक्री केले. तसेच कोणकोणत्या गोल्ड फायनान्समध्ये गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली